शरद पवार यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
By admin | Published: October 13, 2016 06:12 AM2016-10-13T06:12:04+5:302016-10-13T06:12:04+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली. मराठा समाजातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून, तसेच ती तोट्यात असल्याने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याने, त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आणि केंद्र सरकार दोघांच्या कक्षेतील असून, या संवेदनशील प्रश्नावर संसदेत चर्चा व्हावी, तसेच इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती पवार यांनी मोदी यांच्याकडे केली. त्यावर मोदी यांनी काय मत व्यक्त केले, हे समजू शकले नाही. मराठा समाजातर्फे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी निघणारे मूक मोर्चे, त्यांना मिळणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी मोदी यांना दिली. या बैठकीत पवार यांनी ऊस उत्पादक शेतकरी, तसेच राज्यातील
साखर कारखान्यांचे प्रश्नही पंतप्रधानांकडे मांडले. (वृत्तसंस्था)