500, हजारांच्या नोटांवरील बंदीचे शरद पवार यांनी केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2016 12:44 PM2016-11-09T12:44:57+5:302016-11-09T12:44:57+5:30
500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय पंदप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय पंदप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. या बंदीवरून सोशल मीडियावर पवार यांची खिल्ली उडवली जात असतानाच शरद पवार यांनी मोदींच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे.
बुधवारी सकाळी ट्विट करून पवार यांनी नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठी उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे. "500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. या निर्णयामुळे काळ्या पैशाला अंकुश लागण्यास मदत होणार आहे. तसेच दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठाही कमी होईल," असे शरद पवार म्हणाले.
We welcome the decision to #demonetise currency notes - Rs 500 & Rs 1000. This will curb #BlackMoney and #terror financing.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) 9 November 2016