शरद पवारांची प्रकृती स्थिर

By admin | Published: January 25, 2016 03:04 AM2016-01-25T03:04:32+5:302016-01-25T03:04:32+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.

Sharad Pawar's condition is stable | शरद पवारांची प्रकृती स्थिर

शरद पवारांची प्रकृती स्थिर

Next

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रांट यांच्या देखरेखीखाली पवार यांच्यावर उपचार चालू आहेत़ डॉ़ ग्रांट म्हणाले, पवार यांच्या शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल बिघडल्याने त्यांना दाखल करण्यात आले आहे़ आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही़ परंतु त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे.

Web Title: Sharad Pawar's condition is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.