शरद पवार यांची चौकशी योग्य नाही : रामदास आठवलेंनी केली पाठराखण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 18:40 IST2019-09-27T18:39:50+5:302019-09-27T18:40:45+5:30
शिवसेनेनंतर आता आठवलेंचीही पवारांना साथ

शरद पवार यांची चौकशी योग्य नाही : रामदास आठवलेंनी केली पाठराखण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असताना शिवसेनेच्या पाठोपाठ आरपीआयनेही (आठवले गट) त्यांची पाठराखण केली आहे. आठवले यांनी पुण्यात पावसाचा तडाखा बसलेल्या टांगेवाला कॉलनीला भेट दिली. त्यावेळी त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
त्यावेळी पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ते म्हणाले की, ' जरी आचारसंहिता लागू असेल तरीही त्यातून मार्ग काढून अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पवार यांच्या ईडी चौकशीवरही मत मांडले. ते म्हणाले की,पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत.त्यांची चौकशी करणे योग्य नाही हे अण्णा हजारे यांनीही सांगितले आहे.त्यामुळे त्यांची चौकशी ईडीनेही करू नये असे आमचे मत आहे.पवार यांचा कारभार अतिशय सूक्ष्म आणि नियमाला धरून असून ईडीनेही त्यांची चौकशी करू नये असे आमचे मत आहे. त्यामुळे शिवसेनेनंतर आता आठवले यांच्या रूपाने आरपीआयही पवार यांना साथ देताना दिसत आहे.