मुख्यमंत्र्यांच्या बोगस फेसबुकवर शरद पवारांची बदनामी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:22 AM2018-01-05T05:22:12+5:302018-01-05T05:22:34+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु आहे. संबंधितांविरुद्ध आम्ही न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

 Sharad Pawar's slander on Chief Minister's bogus Facebook | मुख्यमंत्र्यांच्या बोगस फेसबुकवर शरद पवारांची बदनामी  

मुख्यमंत्र्यांच्या बोगस फेसबुकवर शरद पवारांची बदनामी  

Next

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उघडण्यात आलेल्या बोगस फेसबुक अकाऊंटवर राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी सुरु आहे. संबंधितांविरुद्ध आम्ही न्यायालयीन कारवाई करूच, परंतु यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
पवार हे ज्येष्ठ नेते असून देश आणि महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रीय पातळीवर जेव्हा समस्या निर्माण होतात त्या-त्यावेळी पवारांचा सल्ला घेतला जातो. गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती आली त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पवारांवर जबाबदारी सोपवली होती. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली या देशात दुसरी कृषीक्रांती घडवण्याचे काम पवार यांनी केले, असेही ते म्हणाले.

आरोपीवर गुन्हा दाखल
ठाणे : देशहितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली, तरी पाप लागणार नाही, अशी पोस्ट टाकणाºया माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून केली. संध्याकाळी आरोपीवर उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. अशा पद्धतीची घाणेरडी पोस्ट मी माझ्या राजकीय जीवनात पाहिलेली नाही. अशा लोकांवर कारवाई करावी, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

Web Title:  Sharad Pawar's slander on Chief Minister's bogus Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.