जिल्ह्यातील शेतीप्रश्नाबाबत शरद पवार यांची चर्चा
By admin | Published: April 2, 2017 10:39 PM2017-04-02T22:39:41+5:302017-04-02T22:39:41+5:30
मुंबईहून औरंगाबादसाठी निघालेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले.
नाशिक : मुंबईहून औरंगाबादसाठी निघालेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे रविवारी नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी जिल्ह्यातील शेतीच्या अवस्थेबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबाबत त्यांनी माहिती घेतली.
शरद पवार यांचा सोमवारी औरंगाबाद येथे दौरा आहे. त्यानिमित्ताने ते शहरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामास आले आहेत. त्यावेळी त्यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांची माहिती घेतली. तसेच आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा दिला पाहिजे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. पवार यांना पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार दिलीप बनकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी श्रीराम पवार, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, नाना महाले आदि उपस्थित होते. शरद पवार हे नाशिकमध्ये मुक्कामी असून सकाळी सात वाजता ओझर येथून विमानाने औरंगाबाद येथे रवाना होणार आहे.