पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा
By Admin | Published: July 29, 2016 08:27 PM2016-07-29T20:27:24+5:302016-07-29T20:27:24+5:30
मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी : मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. आता हा धडा वगळण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे गोव्याच्या विद्यार्थ्यांना शारापोव्हाच्या प्रेरणेची गरज नाही, असे दिसत आहे. डोपिंग (उत्तेजक द्रव्य सेवन) प्रकरणात अडकल्यामुळे शारापोव्हाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याचा परिणाम भारताच्या विविध भागात होत आहे.
शारापोव्हाच्या जीवनावर आधारित एक धडा गोव्याच्या नववीतील पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता.
ज्यात शारापोव्हाच्या यशाची गाथा सांगण्यात आली होती. मात्र, ती डोपिंगमध्ये अडकल्यानंतर तिचा धडा पुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत याच वर्षी शारापोव्हाने उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिला बंदीचा सामना करावा लागत आहे.
काहींच्या मते, गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाने (जीबीएसएचएसई) हा धडा इंग्रजी पाठ्यपुस्तकातून वगळण्यात यावा, ही मागणी बोर्डाने सुद्ध मान्य केली असून हा धडा वगळण्याचा निर्णय घेतला आहे. पाच वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या मारियावर ह्यरिच फॉर द टॉपह्ण हा धडा २००६-०७ मध्ये गोव्याच्या इयत्ता ९ वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता. आता त्याचा गोव्यातील शिक्षक संघांनी विरोध केला आहे.
विरोधानंतर जीबीएसएचएसईने एक सर्क्युलर जारी केले असून आता हा धडा पुढील वर्षापासून वगळण्यात येईल. यासंदर्भात, बोर्ड सचिव शिवकुमार जंगम यांनी दुजोरा दिला असून पुढील वर्षापासून हा निर्णय अमलात आणला जाईल, असेही स्पष्ट केले.