मोदींच्या मातोश्रींसाठी शरीफ यांचा ‘नजराणा’

By admin | Published: June 5, 2014 11:58 PM2014-06-05T23:58:12+5:302014-06-05T23:58:12+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींसाठी शुभ्र पांढरी साडी भेट म्हणून पाठवली आह़े

Sharif's 'Nazarena' for Modi's mother | मोदींच्या मातोश्रींसाठी शरीफ यांचा ‘नजराणा’

मोदींच्या मातोश्रींसाठी शरीफ यांचा ‘नजराणा’

Next
>नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींसाठी शुभ्र पांढरी साडी भेट म्हणून पाठवली आह़े 
खुद्द मोदींनी टि¦टरवर याची माहिती दिली़ नवाज शरीफजींनी माङया आईसाठी एक सुंदर पांढरी साडी पाठवली आह़े मी त्यांचा आभारी आह़े  शरीफ यांनी पाठवलेली भेट मी लवकरच आईर्पयत पोहोचती करेन, असे टि¦ट मोदींनी केले आह़े शरीफ अलीकडे भारत भेटीवर आले असता, मोदींनी त्यांच्या आईसाठी एक शाल भेट म्हणून पाठवली होती़ याबद्दल शरीफ यांची मुलगी मरियम हिने मोदींचे टि¦टरवरून आभार मानले होत़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
शरीफ यांच्याबाबत मोदींनी दुस:यांदा टि¦ट केले आह़े 26 मे रोजी शपथविधी सोहळ्यानंतर लगेच मोदींनी त्यांच्या व शरीफ यांच्या अनौपचारिक चर्चेबाबत टि¦टरवरून माहिती दिली होती़ दोघांमध्येही भावनात्मक चर्चा झाली़ आई मला मिठाई भरवत असतानाचे छायाचित्र शरीफजी आणि त्यांच्या आईच्या मनाला भावल़े हे छायाचित्र पाहून आपली आई खूप भावनिक झाल्याचे शरीफ यांनी मला सांगितल़े शरीफ आठवडय़ातून एकदा आपल्या आईला भेटायला जातात, असे मोदींनी टि¦टरवर लिहिले होत़े (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Sharif's 'Nazarena' for Modi's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.