Riaz Bhati With Politician: रियाझ भाटीचे थेट शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत फोटो शेअर करत नितेश राणेंचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 12:29 PM2021-11-10T12:29:17+5:302021-11-10T12:38:16+5:30
Riaz Bhati With Politician: Nawab Malik यांनी Devendra Fadanvis यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर BJP नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीवर नेहमीच बोचरी टीका करणारे भाजपा आमदार Nitesh Rane यांनी रियाझ भाटीचे Sharad Pawar आणि Uddhav Thackeray यांच्यासोबतचे फोटो शेअर करून नवाब मलिक यांना सवाल विचारला आहे.
मुंबई - दाऊद इब्राहिमचा माणूस रियाझ भाटीसोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब यांनी केला होता. मात्र मलिक यांच्या आरोपांनंतर भाजपा नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीवर नेहमीच बोचरी टीका करणारे भाजपा आमदार नितेश राणेंनी रियाझ भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर करून नवाब मलिक यांना सवाल विचारला आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी रियाझ भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि विचारले की, नवाबभाई म्हणतात की, रियाझ भाटी हा दाऊदचा माणूस आहे. पण त्यांना म्हणायचे काय आहे, असा सवाल नवाब मलिक यांना नितेश राणेंनी विचारला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींची सरकारी पदांवर वर्णी लावण्यात आली. फडणवीसांच्या काळात गुन्हेगारांना संरक्षण देण्यात आलं. राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केले.
नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’….
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2021
Nawab Bhai says @riyazbhati is Dawood Ibrahim’s man... अरे ये कहना क्या चाहते हैं ?..
Does @NawabMalik bhai mean this 👇 pic.twitter.com/LiYqNAAY1r
रियाझ भाटी कोण आहे? २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्टमुळे सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम गँगसोबत त्याचे संबंध असल्याच्या बातम्या आल्या. दोन पासपोर्टसोबत पकडला जाऊनही तो दोन दिवसांत सुटला. तो भाजपाच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलवर का दिसत होता. पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले. तुमच्या आशीर्वादाने हा सगळा खेळ चालत होता, असा गंभीर आरोप मलिकांनी केला होता.