शशिधर सिन्हा एबीसीचे नवे चेअरमन
By admin | Published: September 10, 2015 02:53 AM2015-09-10T02:53:10+5:302015-09-10T02:53:10+5:30
आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन (एबीसी)च्या चेअरमनपदी शशिधर सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा
मुंबई : आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशन (एबीसी)च्या चेअरमनपदी शशिधर सिन्हा यांची एकमताने निवड करण्यात आली. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची प्रकाशक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड २०१५-१६ या वर्षासाठी आहे.
एबीसीच्या ६७ व्या सर्वसाधारण बैठकीत सिन्हांसह अन्य सदस्य व प्रतिनिधींची एकमताने निवड करण्यात आली. सिन्हा हे आयपीजी मीडिया ब्रँड्स, इंडिया कंपनीचे अध्यक्ष आहेत. ते एएससीआय, एमआरयूसी व आरएससीआय या उद्योग संस्थांमध्येही कार्यरत होते. अॅड क्लबचे अध्यक्ष म्हणूनही सिन्हा यांनी काम पाहिले आहे. बीएआरसीच्या तांत्रिक समितीत सिन्हा कार्यरत होते. तर इनाडूचे आय. वेंकट यांची एबीसीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
‘डिजिटल मेजरमेंट प्रोजेक्ट’ची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट सिन्हा यांच्यासमोर आहे. या योजनेचा लाभ माध्यम कंपन्यांना होणार आहे. याद्वारे कंपन्यांना डिजिटल स्वरूपात संपूर्ण डेटा उपलब्ध होणार आहे.
एबीसी डिजिटल ग्राहकही मोजणार
स्मार्टफोनमुळे डिजिटल जाहिरातींकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. अशा जाहिरातांना प्रतिसाद देणाऱ्या ग्राहकांची मोजणी करण्यासाठी एबीसी अत्याधुनिक तंत्र विकसित करणार आहे. यासाठी अनुभवी कंपनीसोबत एबीसी करार करणार आहे. लवकरच हे तंत्र विकसित केले जाईल.
एबीसी जाहिरात संस्था प्रतिनिधी
शशिधर सिन्हा, अध्यक्ष, आयपीजी मीडिया ब्रँड्स, मधुकर कामथ, खजिनदार, मुद्रा कम्युनिकेशन, श्रीनिवासन के. स्वामी, आर.के. स्वामी बीबीडीओ, सीव्हीएल श्रीनिवासन, ग्रुप एम. मीडिया इंडिया प्रा. लि.
एबीसी प्रकाशक प्रतिनिधी
देवेंद्र दर्डा, लोकमत मीडिया प्रा. लि., आय. वेंकट, उषोदया इंटरप्रायझेस लि., उपाध्यक्ष, अमित मॅथ्यू, मलायला मनोरमा कं. लि., शैलेश गुप्ता, जागरण प्रकाशन लि., हॉरमुसजी एन. कामा, द बॉम्बे समाचार प्रा. लि., संजीव व्होरा, बेनेट, कोलमन अॅण्ड कं. लि., बेनॉय रॉयचौधरी, एचटी मीडिया लि., चंदन मजुमदार, एबीपी प्रा.लि.
जाहिरात प्रतिनिधी
हेमंत मलिक, आयटीसी लि., सचिव, देबब्रत मुखर्जी, कोका-कोला इंडिया प्रा.लि., संदीप टर्कस, फ्युचर रिटेल लि.
सचिवालय : हॉर्म्युज मसाणी, महासचिव