हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक

By admin | Published: August 9, 2014 03:04 AM2014-08-09T03:04:52+5:302014-08-09T03:04:52+5:30

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी करीत शुक्रवारी इंदापूर तालुक्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली.

Shayfek on Harshwardhan Patil | हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक

हर्षवर्धन पाटील यांच्यावर शाईफेक

Next
>बारामती / पळसदेव (जि. पुणो) : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची मागणी करीत शुक्रवारी इंदापूर तालुक्यात सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई टाकण्यात आली. त्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी सचिन मलगुंडे आणि दादा थोरात (रा. भिगवण, ता. इंदापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेचे पडसाद भिगवणसह इंदापूर तालुक्यात उमटून ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला होता.
भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ‘ट्रॉमा केअर’च्या उद्घाटनानंतर बाहेर पडताना पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकत्र्यानी आरक्षणासंदर्भात निवेदन दिले. त्याचवेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचा युवक उपाध्यक्ष सचिन मलगुंडे याने हातातील पिचकारीतून पाटील यांच्या दिशेने शाई फेकली. ती पाटील यांच्या डोळ्यात गेली. हे पाहून काँग्रेस कार्यकत्र्यानी मलगुंडेवर हल्ला चढविला. पोलिसांनी लगेच मलगुंडे याला ताब्यात घेतले.  
पाटील यांच्या बुबुळास जखम झाली असून पापणीच्या खालचा भाग भाजला. तसेच डाव्या हाताच्या कोपराला व उजव्या पायाच्या अंगठय़ालाही भाजले आहे. रुबी हॉलचे डॉ. राजेश देशपांडे यांनी सांगितले की, पाटील यांच्यावर फेकलेल्या शाईत कोरोङयु नामक रसायन आहे. त्याची बाधा झाल्यास पूर्ण डोळा खराब होण्याची शक्यता असते. रंगांत मिश्रण म्हणून हे रसायन वापरले जाते. औषधोपचारांनतर त्यांचा डोळा पूर्ववत होईल.
 
लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलनाचा हक्क असतो, पण असे प्रकार झाले तर काम करणो अवघड होईल.
- हर्षवर्धन पाटील
 
हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचे दिसते. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काही राजकीय पक्ष धनगर समाज आरक्षणाच्या मुद्यावर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Shayfek on Harshwardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.