बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाईफेक

By Admin | Published: October 12, 2016 03:52 PM2016-10-12T15:52:02+5:302016-10-12T15:52:02+5:30

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार

Shaypyak on Sharad Pawar's photo of Baramati hostel | बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाईफेक

बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाईफेक

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 12 - पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमधील शरद पवार यांच्या फोटोवर शाई फेकण्याच्या प्रकार केला. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले.
उमेश कोकरे, विजय भोसले आणि नितीन काळे अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी बारामती होस्टेलचे सुपरिटेंड शिवाजी काळे यांनी फिर्याद दिली आहे. भगवानगड येथे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी हिंगणे येथील जानकर यांच्या कार्यालयाची मोडतोड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती.
याप्रकारानंतर बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय समाज पक्षाचे ६ ते ७ कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेलमध्ये शिरु लागले, तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ त्यांना न जुमानता ते आत शिरले. आतल्या बाजूला असलेल्या शरद पवार यांच्या फोटोवर त्यांनी शाई फेकली व ते पळून जाऊ लागले. तेव्हा तेथील तरुणाने उमेश कोकरे याला पकडले. ही घटना समजताच जनवाडी पोलीस चौकीतील पोलिसांनी तेथे येऊन काकरे याला ताब्यात घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही घटना समजताच आमदार अनिल भोसले, माजी नगरसेवक निलेश निकम, युसुफखान, उदय महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जनवाडी पोलीस चौकीसमोर गर्दी केली़ तेव्हा रासपचे कार्यकर्ते संतोष पाटील हे तेथे उभे राहून फोनाफोनी करीत होते़ त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व त्यांच्यात वादावादी झाली़ काही जणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले. 
जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मोडतोड करताना रासपचे राज्य सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या आई, पत्नी व मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली़ पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही़ त्याच्यानिषेधार्थ आपण हे कृत्य केल्याचे उमेश कोकरे याचे म्हणणे आहे.

Web Title: Shaypyak on Sharad Pawar's photo of Baramati hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.