‘ती’ कोट्यवधीची माया कोल्हापूरच्या बिल्डरची?

By admin | Published: March 17, 2016 01:14 AM2016-03-17T01:14:46+5:302016-03-17T01:14:46+5:30

वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मधून १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये बुधवारी कोडोली पोलिसांनी जप्त केले. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सापडलेली

'She' billions of billions of builders of Kolhapur? | ‘ती’ कोट्यवधीची माया कोल्हापूरच्या बिल्डरची?

‘ती’ कोट्यवधीची माया कोल्हापूरच्या बिल्डरची?

Next

कोल्हापूर : वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नंबर ५ मधून १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये बुधवारी कोडोली पोलिसांनी जप्त केले. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सापडलेली तीन कोटींची रोकडही याच इमारतीमधून चोरीस गेली होती. सुमारे सव्वाचार कोटींची बेहिशेबी रक्कम वारणानगर (ता. पन्हाळा) येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मैनुद्दिन मुल्ला याच्या घरात सापडलेली रक्कम कुणाची याची चर्चा गेली चार दिवस सुरु असताना त्यावर मालकी सांगायला कोणीच तयार नव्हते. अचानक मंगळवारी रात्री कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक झुंझारराव सरनोबत यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील हे आपले साडू आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षक कॉलनीमधील बिल्डिंगमध्ये आपण जमिनीच्या व्यवहारासाठी आणलेले सुमारे ३ कोटी ११ हजार रुपये ठेवले होते. त्या रकमेची चोरी झाल्याची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक व मल्टी डेव्हलपर्सचे मालक झुंझार माधवराव सरनोबत (वय ४६, रा. शिवाजी पेठ) यांनी मंगळवारी रात्री कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वारणा समुहाचे नेते व माजी आमदार विनय कोरे हे या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष असले तरी संस्थेचा सर्व व्यवहार सचिव जी. डी. पाटील हेच पाहतात. मिरज बेथेलहेमनगरमधून मोहीद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला याच्या घरातून ३ कोटी ७ लाख ६३ हजार रुपये १२ मार्चला जप्त केले. त्याने सुरुवातीला ही रक्कम कर्नाटकातील एका शिक्षण संस्थेशी संबंधित खासदाराची हवाला मधील असल्याचे सांगितले होते. परंतु पोलीस तपासात त्यात फारसे तथ्य आढळले नाही. म्हणून इतकी मोठी रक्कम आली कुठून याबाबत मुल्ला याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंग नं. ५ मधून साथीदार रेहान अन्सारी याच्या मदतीने चोरल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ धनवट यांनी मंगळवारी मैनुद्दीन याला वारणानगर परिसरात फिरविले. जेथून रोकड लंपास केली, त्या शिक्षक कॉलनीच्या बिल्डिंगमधील फ्लॅट नं. ३ ची पाहणी केली असता तिजोरीमध्ये आणखी काही रक्कम असल्याचे दिसून आले. झुंझार सरनोबत यांनी कोडोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत वारणा शिक्षण मंडळाच्या कॅम्पसमधील शिक्षक कॉलनी बिल्डींग नं. ५ मध्ये जमिनीच्या व्यवहारासाठी आणून ठेवलेली रक्कम ३ कोटी ११ लाख रुपये चोरीस गेल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)

पैसे मोजायला तीन तास
वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनी बिल्डिंगला पाचला मंगळवारी दुपारपासून सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद मेमाणे, ठसेतज्ज्ञ जी. एस. पाटील, बँक आॅफ इंडिया शाखेचे अधिकारी विजय पत्रावळे व विजय कांबळे, सरकारी पंच असा फौजफाटा आला. तिजोरीतील पैशांचा पंचनामा करून ते मशिनद्वारे मोजले असता १ कोटी ३१ लाख २९ हजार रुपये मिळाले. हे पैसे मोजायला तीन तास लागले.

शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील हे मंगळवारी सकाळपासून गायब आहेत. त्यांच्या मोबाईलवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो ‘स्वीच आॅफ’ होता.

वारणा शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील व झुंझार सरनोबत हे नातेवाईक असून त्यांचे चांगले संबध आहेत. त्यांचा भागिदारीमध्ये व्यवसाय असल्याने शिक्षण संकुलातील इमारतीमधील रुम वापरण्यास दिली ही आमची चुक आहे. या प्रकरणाची समितीतर्फे चौकशी करु, या पैशाचा वारणा उद्योग समुहाशी काडीमात्र संबध नाही.- विनय कोरे, अध्यक्ष वारणा शिक्षण मंडळ

Web Title: 'She' billions of billions of builders of Kolhapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.