पोलीस बंदोबस्तात ‘तिने’ दिली परीक्षा

By admin | Published: March 27, 2016 01:21 AM2016-03-27T01:21:59+5:302016-03-27T01:21:59+5:30

इंदिरा नगर झोपडपट्टीतील खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणीने शनिवारी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तात

She complained about the police constable | पोलीस बंदोबस्तात ‘तिने’ दिली परीक्षा

पोलीस बंदोबस्तात ‘तिने’ दिली परीक्षा

Next

अमरावती : इंदिरा नगर झोपडपट्टीतील खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय तरुणीने शनिवारी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तात वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाची परीक्षा दिली. तिच्यासह वडिलांनाही अटक करण्यात आली आहे.
धुळवडीच्या दिवशी बाहेरील युवकांना परिसरात घेऊन आल्यावरून इंदिरानगर झोपडपट्टीत दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये आकाश गोपाल बाजड (२५) याचा चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यासंदर्भात १९ वर्षीय मुलीसह तिचे वडील व काकाला अटक करण्यात आली आहे. तीनही आरोपीला न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हाणामारीत तिची आई जखमी झाली आहे. संशयित तरुणीची वाणिज्य शाखेची परीक्षा सुरू आहे. परीक्षा देण्यासंबंधी तिने रीतसर न्यायालयीन व पोलीस परवानगी घेतली. त्यानंतर शनिवारी दुपारी २ वाजता तिला पोलीस बंदोबस्तात मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नेण्यात आले. पेपर सोडविण्यासाठी तिला महाविद्यालयात एक स्वतंत्र कक्ष देण्यात आला होता.

आरोपी मुलगी ही बी.कॉम.ची विद्यार्थिनी असून तिने पेपर सोडविण्यासंबंधी परवानगी मागितली होती. तिला पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रावर पोहचविण्यात आले असून परीक्षा संपल्यानंतर ताब्यात घेतले जाईल.
- एस.एस.भगत, पोलीस निरीक्षक, राजापेठ पोलीस ठाणे

Web Title: She complained about the police constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.