धक्कादायक ! कौमार्य चाचणीला नकार दिल्यानं दांडिया खेळायला विराेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 11:07 AM2018-10-16T11:07:02+5:302018-10-16T11:23:08+5:30

काैमार्य चाचणीला विराेध केला म्हणून दांडिया खेळण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना पिंपरीतील भाटनगर मध्ये घडली अाहे.

as she fight against old customs; they did not allow her to play dandia | धक्कादायक ! कौमार्य चाचणीला नकार दिल्यानं दांडिया खेळायला विराेध

धक्कादायक ! कौमार्य चाचणीला नकार दिल्यानं दांडिया खेळायला विराेध

googlenewsNext

पुणे : समाजातील अनिष्ठ रुढीला मुठमाती देत काैमार्य चाचणीला विराेध करुन समाजात एक नवीन अादर्श निर्माण केलेल्या एेश्वर्या तमाईचकर यांना समाजाकडून बहिष्काराला सामाेरे जावे लागले अाहे. नवरात्रीनिमित्त माहेरी गेलेल्या एेश्वर्या यांना काैमार्य चाचणीला विराेध करुन समाजाची बदनामी केल्याचे म्हणत दांडिया खेळण्यापासून राेखण्यात अाले. तसेच दांडियाचा कार्यक्रम थांबवण्यात अाला.


    विवेक अाणि एेश्वर्या तमाईचकर यांनी माेठा लढा देत काैमार्य चाचणीला विराेध केला. यामुळे त्यांना त्यांच्या भाट समाजातून माेठ्या राेषाला सामाेरे जावे लागले. मे महिन्यात दाेघांनी पिंपरीत विवाह केला. विवेक अाणि एेश्वर्या यांनी अनिष्ठ रुढीच्या विराेधात लढा दिल्याने त्यांच्या समाज्याकडून त्यांना बहिष्कृत करण्यात अाले अाहे. साेमवारी एेश्वर्या या त्यांच्या माहेरी पिंपरी येथे गेल्या हाेत्या. भाटनगर येथे देवीची अारती झाल्यानंतर दांडिया चा कार्यक्रम सुरु झाला. काहीवेळाने एेश्वर्या अाणि त्यांच्या काही मैत्रिणी यांनी दांडिया खेळण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अायाेजकांच्या लक्षात ही गाेष्ट अाल्यानंतर दांडिया थांबविण्यात अाला. तसेच एेश्वर्या यांच्या अाईला त्यांना येथून घेऊन जाण्यास सांगण्यात अाले. एेश्वर्या यांच्या ही गाेष्ट लक्षात येताच त्यांनी तेथून जाण्यास नकार दिला. त्यामुळे अायाेजकांनी दांडियाचा कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच केवळ मुलांना डिजेवर नाचण्याची परवानगी दिली. एेश्वर्या यांना बहिष्कृत करण्यात अाल्याने त्या पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर पुन्हा दांडियाचा कार्यक्रम सुरु करण्यात अाला.


    याबाबत एेश्वर्या यांनी पिंपरी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली अाहे. एेश्वर्या म्हणाल्या, मी दांडिया खेळण्यास सुरु केल्यानंतर दांडियाचा कार्यक्रम बंद करण्यात अाला. कार्यक्रम का बंद केला याबाबत मला कळाले नाही. मी घरी जाऊ लागले तेव्हा अायाेजकांपैकी काही लाेक माझ्या अाईला मला तेथून घेऊन जाण्यास सांगत हाेते. मी काैमार्य चाचणीला विराेध केल्याने समाजाची बदनामी झाल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. तसेच त्यामुळे त्यांनी मला दांडिया खेळण्यापासून राेखले. त्यानंंतर मी पिंपरी पाेलिसांमध्ये तक्रार दाखल केली अाहे. लग्न झाल्यापासून अाम्हाला समाजाकडून कुठल्याही कार्यक्रमांमध्ये सहभागी करुन घेतले जात नाही. कसलेच बाेलावणे येत नाही. अाम्हाला समाजाने एकप्रकारे बहिष्कृत केले अाहे. 

Web Title: as she fight against old customs; they did not allow her to play dandia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.