नाझरेतील ‘ती’ घटना ‘वॉटर स्प्रॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:16 AM2018-06-10T05:16:51+5:302018-06-10T05:16:51+5:30

 The 'she' incident in Nazrul, 'Water Spot' | नाझरेतील ‘ती’ घटना ‘वॉटर स्प्रॉट’

नाझरेतील ‘ती’ घटना ‘वॉटर स्प्रॉट’

Next

पुणे - वादळ, वावटळ आपण अनेक पाहिली असतील,पण शुक्रवारी पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळील नाझरे जलाशय परिसरातील ती ‘वावटळ’ सोशल मीडियासह सर्वत्र चर्चिली गेली. अचंबित करणारा नेमका हा प्रकार काय आहे? याबाबत पर्यावरण व हवामान तज्ज्ञांशी चर्चा केली असता, हवामानाचा हा अनोखा आविष्कार होता़ नाझरे येथे दिसले ते आपल्याकडे क्वचित होणारे ‘वॉटर स्प्रॉट’ असल्याचे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले़
शुक्रवारी दुपारनंतर पुणे जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटसह पाऊस झाला. नाझरे जलाशयात सायंकाळी एक वादळ निर्माण झाले. पण ते नाझरे धरणावर होते. त्याने धरणातले पाणी खेचले आणि वर ढगात घेऊन गेले. तीन मिनिटे हा प्रकार सुरू होता. याचा व्हीडीओ व्हायलर झाल्याने नेमका का काय प्रकार आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
डॉ़ कुलकणी यांनी सांगितले की, अमेरिकेत टोरनॅडो बऱ्याच वेळा होतात. जेव्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असते अशावेळी हवेचा दाब एकदम कमी होतो़ तो नेहमीपेक्षा निम्म्याने कमी झालेला असतो़ त्यात ढगातील पाणी एका टनेलप्रमाणे झोत खाली येतो़ ज्याप्रमाणे चक्रीवादळात अथवा वावटळीत सर्व वस्तू चक्राकार फिरत त्यात उचलल्या जातात़ त्याप्रमाणे यात त्यात सापडणाºया सर्व वस्तू उचलल्या जातात़ अगदी गाड्याही उचलण्याची ताकद या वावटळीत असते़ जमिनीवर हे आले तर, त्याला टोरनॅडो म्हटले जाते आणि पाण्यावर आल्यावर त्याला ‘वॉटर स्प्रॉट’ असे म्हणतात़
अनेकदा आपल्याला माशांचा पाऊस पडल्याचा बातम्या वाचनात येतात़ तो याचाच प्रकार असतो़ एखाद्या ठिकाणी पाण्यावर असा चक्रवात आल्यावर त्यात पाण्याबरोबरच त्यातील मासेही उचलले जातात आणि ते नंतर दूर कोठेतरी जाऊन पडतात़ तेव्हा तेथे माशांचा पाऊस असे दिसते़ आपल्याकडे हा प्रकार क्वचितच होतो़ आता मोबाईलमुळे हा प्रकार चित्रित झाल्याने तो सर्वांना समजला, असे डॉ़ कुलकर्णी यांनी सांगितले़
अमेरिका, मेक्सिको, युरोपचा काही भाग, रशिया, आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिलिपिन्स, ब्राझिल-उरुग्वे, दक्षिण आफ्रिका, पूर्व चीन, जपान, अगदी बांगलादेश आणि आपल्याकडं गंगेच्या खोºयातसुद्धा ‘टोरनॅडो’ आढळते, असे पर्यावरणाचे अभ्यासक अभिजित घोरपडे यांनी सांगितले.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले की, गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पाणी जमिनीकडून आकाशाकडे जाऊ शकत नाही. हिवाळ्यात धुके ज्याप्रमाणे वर जाताना दिसते, त्याप्रमाणे पाण्याची वाफ आकाशाकडे जाऊ शकते.

Web Title:  The 'she' incident in Nazrul, 'Water Spot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.