ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तिने लावले ‘फ्रेंच’ रोपटे
By admin | Published: March 7, 2015 11:05 PM2015-03-07T23:05:14+5:302015-03-07T23:05:14+5:30
सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड जीवघेणी स्पर्धा आणि यात टिकून राहायचे, तर हवी प्रचंड मानसिक तयारी; मात्र काही व्यक्ती या थोड्या वेगळ्या असतात.
बारामती : सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड जीवघेणी स्पर्धा आणि यात टिकून राहायचे, तर हवी प्रचंड मानसिक तयारी; मात्र काही व्यक्ती या थोड्या वेगळ्या असतात. त्यांना कोणत्याही स्पर्धेत उतरायचे नसते, ते आपला रस्ता स्वत: शोधतात. या स्पर्धेच्या बाहेर ते स्वत: मार्ग चोखाळतात. बारामती शहरातील युवतीने असेच स्वत:चे विश्व निर्माण केले आहे. वैशाली डेंगळे असे या युवतीचे नाव आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ती फें्र च शिकवतेय. ग्रामीण विद्यार्थ्यांना वैशालीने परकीय भाषा शिकण्याचे स्वप्न दाखविले आहे. परकीय भाषेतील करिअर प्रथमच येथील विद्यार्थ्यांना खुणावत आहे. बारामतीतसुद्धा परकीय भाषेला पुण्याइतकाच ‘स्कोप’आहे, हे तिच्या उदाहरणावरून दिसून येते.
मुळचे बारामती कसब्यात असणारे डेंगळे कुटुंबीय वडील शरद डेंगळे यांच्या एअर
फ ोर्सच्या सेवेमुळे भारतभर फिरले आहे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून वैशालीने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर इतर पर्याय उपलब्ध असतानाही तिने
फे्रं चमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. खरे तरे फें्र च भाषा तिच्या उच्चारांमुळे शिकण्यास अवघड आहे. मात्र, तिने या सगळ्या अडथळ्यांना पार करीत आपले शिक्षण पूर्ण केले. आपण मनात आणले, तर ही भाषा बारामतीसारख्या ग्रामीण भागातही आपण यशस्वीपणे शिकवू शकतो, हे तिने सिद्ध केले आहे. सुरुवातीला एका मुलापासून तिने फें्रच शिकवण्यास सुरुवात केली. आता विद्या प्रतिष्ठानमध्ये त्या ४० मुलांना फें्र च शिकवित आहेत.