आत्महत्येपूर्वी जिया होती गर्भवती

By admin | Published: December 11, 2015 01:49 AM2015-12-11T01:49:25+5:302015-12-11T09:05:29+5:30

जिया खान आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. २०१३ मध्ये आत्महत्या करणारी जिया खान मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी गर्भवती होती. प्रियकर सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी गोळी दिली होती.

Before she was pregnant, she was pregnant | आत्महत्येपूर्वी जिया होती गर्भवती

आत्महत्येपूर्वी जिया होती गर्भवती

Next

मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. २०१३ मध्ये आत्महत्या करणारी जिया खान मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी गर्भवती होती. प्रियकर सूरज पांचोलीने तिला गर्भपातासाठी गोळी दिली होती. एवढेच नाही, तर सूरजनेच भ्रूण काढून ते टॉयलेटमध्ये फेकले, अशी धक्कादायक माहिती सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या आरोपपत्राद्वारे समोर आली आहे.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी जिया सूरजपासून गर्भवती होती. जियाच्या गर्भपातासाठी सूरज गायनाकॉलॉजिस्टकडे गेला. गायनाकॉलॉजिस्टने गभर्पातासाठी काही गोळ्या जियाला दिल्या. या गोळ्या खाल्ल्यानंतर जियाला रक्तस्त्राव झाला. त्यामुळे घाबरलेल्या जियाने सूरजला कॉल केला. सूरजने गायनाकॉलॉजिस्टला जियाकडे पाठवले. या डॉक्टरने जियाला हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितले.
गायनाकॉलॉजिस्टने सूरजला सांगितले की, गर्भपात झाला आहे, पण भ्रूण अजूनही तिच्या गर्भात आहे. रक्तस्राव थांबवण्यासाठी ते बाहेर काढणे आवश्यक आहे. सूरजने स्वत:च हे भ्रूण बाहेर काढले आणि टॉयलेटमध्ये फेकले. मात्र, डॉक्टर उपस्थित असूनही सूरजने असे का केले? याचा उल्लेख सीबीआयच्या आरोपत्रात नाही. ही बाब सार्वजनिक झाली, तर करिअरवर परिणाम होईल, अशी भीती सूरज पांचोलीला होती. त्यामुळे गभर्पात झाल्यानंतरही त्याने जियाला हॉस्पिटलमध्ये नेले नाही.
जिया खानने ३ जून २०१३ रोजी गळफास घेऊन तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. जियाची आई राबियाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून, या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. जियाची हत्या झाली आहे, असा आरोप राबिया यांनी केला होता. उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला. सीबीआयने ९ डिसेंबर रोजी कोर्टात आरोपपत्र दाखल केले. (प्रतिनिधी)

Web Title: Before she was pregnant, she was pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.