शेगावच्या केंद्रावर शेतक-यांचा राडा!

By admin | Published: February 14, 2017 12:34 AM2017-02-14T00:34:34+5:302017-02-14T00:34:34+5:30

नाफेडच्या काट्यावर व्यापा-यांच्या तुरीची खरेदी; शेतक-यांकडून २00 रुपयांची मागणी.

Sheadaan Center, Rada! | शेगावच्या केंद्रावर शेतक-यांचा राडा!

शेगावच्या केंद्रावर शेतक-यांचा राडा!

Next

शेगाव(जि. बुलडाणा), दि. १३- बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा, यासाठी केंद्राच्या आधारभूत किमतीनुसार नाफेडकडून प्रमुख केंद्रांवर तुरीची खरेदी केली जात आहे. हमीभाव व बोनस मिळून तुरीला प्रतिक्विंटल ५0५0 रुपये दर मिळत आहे. परंतु या ठिकाणी शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांचीच चलती आहे. व्यापार्‍यांनी यंत्रणांशी हातमिळवणी करून हा व्यवहार सुरू केल्याचा आरोप करीत शेगावच्या नाफेड खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी सोमवारी खरेदी केंद्र काही काळ बंद पाडले. एव्हढेच नव्हे तर व्यापार्‍यांच्या मालाचेच मोजमाप होत असल्याने शेतकर्‍यांनीच पोलिसांना पाचारण केले.
बाजारपेठांमध्ये सध्या तुरीची आवक वाढू लागली. खुल्या बाजारात तुरीचा दर ३९00 ते ४५00 पयर्ंत होता. हमीभाव खरेदी केंद्रावर ५0५0 रुपये दर आहे. यामुळे नाफेडच्या केंद्रांवर सध्या तूर विक्रीसाठी गर्दी होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील केंद्रावर सध्या बरीच गर्दी झालेली असून, या केंद्रावर शेतकर्‍यांचा नव्ह,े तर व्यापार्‍यांचा माल प्राधान्याने मोजला जात आहे. याबाबत सोमवारी केंद्रावर आलेल्या शेतकर्‍यांनी नाफेड आणि बाजार समितीच्या कर्मचार्‍यांकडून होणारा दुजाभाव पाहुन आवाज उठविला. व्यापार्‍यांच्या मालाची खरेदी बंद पाडित शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना धारेवर धरले. एवढेच नव्हे, तर शेतकर्‍यांसोबत होणार अन्याय पाहण्यासाठी शेतकर्‍यांनीच पोलिसांना फोन करून पाचारण केले. यावेळी शहरचे ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी आपल्या पथकासह खामगाव रोडवरील केंद्रावर पोहचून परिस्थिती जाणून घेतली. यावेळी या केंद्रावर मागील आठवडाभरापासून टोकन देणे बंद आहे. मागून आलेल्या व्यापार्‍यांच्या मालाचे मोजमाप सुरु आहे. याशिवाय काटा लवकर करून घेण्याबाबत २00 रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. व्यापार्‍यांचा राग शांत झाल्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत मालाची चाळणी आणि काटा करण्यात आला.
खरेदी केंद्रावर भ्रष्टाचार ?
शेतकरी गावातच खेडा खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांना तूर विकून मोकळे होत आहेत. नाफेडचे तालुक्याला किंवा विभागात असलेले केंद्र, पैसे मिळण्यास होत असलेला विलंब, कर्ज असल्याने बँकेने तुरीच्या चुकार्‍यातून पैसे वळती केले, तर काय करावे, अशा भीतीपोटी असंख्य शेतकरी हे व्यापार्‍यांना तूर विकून मोकळे होत आहेत. याचा फायदा घेत व्यापारी खेड्यांमध्ये ४000 ते ४२00 रुपये क्विंटल दराने रोख स्वरुपात खरेदी करीत आहेत. खरेदी केलेली हीच तूर ओळखीच्या शेतकर्‍याचा सातबारा मिळवून नाफेडच्या खरेदी केंद्रावर विकली जात असल्याचा आरोप होत आहे. नाफेड केंद्रावर आवक वाढत असल्याने तोलाईला विलंब होण्याचे प्रकार वाढले आहेत. यातूनही काही ठिकाणी काही व्यापार्‍यांनी संगनमत करून मार्ग काढला. मोजमाप करणार्‍यांसोबत ह्यचिरीमिरीह्ण करून व्यापार्‍यांचा माल त्याच दिवशी मोजून काढल्या जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला.

सकाळी ९ च्या नंतर तूर खरेदीस प्रारंभ करण्याच्या सूचना नाफेडच्या आहेत. मात्र सकाळी ६ पासून तुरीची चाळणी केली जात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. याची चौकशी करणार असून, जर कुणी दोषी असेल, तर संबंधितांचे परवाने रद्द करू.
- विलास पुंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव

व्यापार्‍यांचा माल आधी खरेदी केला जात असल्याची तक्रार आज शेतकर्‍यांनी केली. मात्र, असे काहीही नाही. येथे नियमानेच तूर खरेदी होत आहे.
- राम मंगाळे, ग्रेडर नाफेड

रक्कम कर्जात जमा करण्याची भीती
नाफेडचे व्यवहार धनादेशाने केले जात आहेत. यासाठी शेतकर्‍यांना बँक खात्याचा वापर करणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी सोयाबीन विकून खात्यात धनादेश जमा करणार्‍या शेतकर्‍यांचे बँकांनी कर्ज आहे, या कारणाने पैसे थांबविले होते. हाच प्रकार आताही होऊ शकतो, अशा चर्चांमुळे शेतकरी तुरीची नाफेडच्या केंद्रावर विक्री करीत नाही. गावातच चारशे-पाचशे रुपये कमी दराने तुरीची खेडा खरेदी करणार्‍या व्यापार्‍याला विक्री करीत आहे.










 

Web Title: Sheadaan Center, Rada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.