शीना बोरा हत्याकांड - इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास बांग्लादेशात पळाल्याचा अंदाज

By Admin | Published: August 31, 2015 04:32 PM2015-08-31T16:32:51+5:302015-08-31T16:32:51+5:30

शीना बोरा हत्याकांडाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना, इतके दिवस काहीच पत्ता नसलेला इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती सिद्धार्थ दास बांग्लादेशमध्ये गेला असल्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने

Sheena Bora massacre - Indrani's first husband Siddhartha Das escapes in Bangladesh | शीना बोरा हत्याकांड - इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास बांग्लादेशात पळाल्याचा अंदाज

शीना बोरा हत्याकांड - इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास बांग्लादेशात पळाल्याचा अंदाज

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - शीना बोरा हत्याकांडाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना, इतके दिवस काहीच पत्ता नसलेला इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती सिद्धार्थ दास बांग्लादेशमध्ये गेला असल्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने क्विंट या इंग्रजी न्यूज वेबसाईटने वर्तवली आहे.
सिद्धार्थ दास १२ दिवसांपूर्वी म्हणजे इंद्राणीला अटक होण्यापूर्वीच बांग्लादेशात निधून गेल्याचा अंदाज आहे. ऑगस्ट १९ रोजी सिद्धार्थ दास भारतातून नाहिसे झाले आणि दोनच दिवसांनी मुंबई पोलीसांना इंद्राणी संदर्भात टिप मिळाली, त्यामुळे शीनाची हत्या करण्यात आलीची व त्याची माहिती इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायला असल्याची हिंट सिद्धार्थ दासनेच दिली असावी असा कयास आहे.
शीना बोराची एप्रिल २०१२ मध्ये हत्या करण्यात आली, तिचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत रायगड जिल्ह्यातल्या गागोदे येथे जंगलात फेकण्यात आले. त्याच सुमारास तिचा भाऊ मिखाईल बोराच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. आणि हा गु्न्हा दुसरा पती संजीव खन्ना व ड्रायव्हर राय यांच्या मदतीने इंद्राणीनेच केल्याचा आरोप आहे.
या सगळ्यामध्ये शीना व मिखाईलचे वडील असलेल्या सिद्धार्थ दास यांची अनुपस्थिती जाणवत होती. मात्र, क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार सिद्धार्थ आसाममधल्या करीमगंजचा मूळचा रहिवासी असून तो बांग्लादेशमध्ये अब्दुल अबेद याच्या सहाय्याने बांग्लादेशात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शीना बोराच्या हत्येचा तपास करताना पोलीसांचे पथक सिद्धार्थ दासचे कुटुंब राहत असलेल्या आसाममधल्या सिलचर येथे पोचले आणि सिद्धार्थ १९ ऑगस्ट रोजीच नाहीसा झाल्याचे आढळल्याने पोलीस चक्रावले आहेत. त्यामुळे सिद्धार्थनेच पोलीसांना या हत्याकांडाची टिप दिली आणि पळ काढला असा तर्क लढवण्यात येत आहे.
सिद्धार्थ दास १९ ऑगस्ट रोजी गायब झाला आणि पोलीसांनी २१ ऑगस्ट रोजी श्यामवर रायला ताब्यात घेतले ज्याने सगळ्या हत्याकांडाचा भाडाफोड केला हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही. 
विशेष म्हणजे बांग्लादेश सीमेच्या दिशेने जाण्यापूर्वी सिद्धार्थ दासने दुसरी पत्नी व मुलांना दुर्गापूर येथे आपल्या लहान भावाकडे धाडले आहे.

Web Title: Sheena Bora massacre - Indrani's first husband Siddhartha Das escapes in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.