शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला ३ दिवसांची CBI कोठडी

By admin | Published: November 20, 2015 03:25 PM2015-11-20T15:25:32+5:302015-11-20T16:26:48+5:30

शीना बोरा हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेला इंद्राणी मुखर्जीचा पती आणि स्टार ग्रुपचे माजी मुख्याधिकारी पीटर मुखर्जी याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ३ दिवसाची CBI कोठडीत पाठवण्यात येणार आहे.

Sheena Bora massacre - Peter Mukherjee, 3-day CBI closet | शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला ३ दिवसांची CBI कोठडी

शीना बोरा हत्याकांड - पीटर मुखर्जीला ३ दिवसांची CBI कोठडी

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - शीना बोरा हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेला इंद्राणी मुखर्जीचा पती आणि स्टार ग्रुपचे माजी मुख्याधिकारी पीटर मुखर्जी याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ३ दिवसाची CBI कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. २३  नोव्हेंबर पर्यंत त्यांना CBI कस्टडीत त्यांची चौकशी केली जाईल.  शुक्रवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आलेल्या पीटरवर कलम ३०२, १२० ब, २०६, २०१ आणि ३६४ अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला असून चौकशीसाठी पीटरची १४ दिवसांची कोठडी सोपवण्यात यावी अशी मागणी सीबीआयतर्फे न्यायालयात करण्यात आली होती. 
दरम्यान या प्रकरणातील तीन प्रमुख आरोप इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 
शीना बोरा या पोटच्या मुलीची हत्या केल्याचे आरोपपत्र इंद्राणी मुखर्जीसह अन्य दोघांविरुद्ध दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत गुरूवारी सीबीआयने इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी यालाही गजाआड केले होते.  हत्येची माहीती लपवल्याचा आरोपाखाली पीटरला अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा माजी पती संजीव खन्ना आधीपासूनच अटकेत असून आरोपपत्रात त्याचाही समावेश आहे. गुरुवारी सकाळी न्यायालयात आरोपपत्र दाखल करणाऱ्या सीबीआयने सायंकाळी उशिरा पीटरला अटक करून त्याची चौकशी सुरु केली. या वेगवान घडामोडीतून आजवरचा तपास, मुंबई पोलिसांची त्यातील भूमिका, सीबीआयला पीटरच्या अटकेसाठी लागलेला वेळ आणि आरोपपत्र दाखल होण्याआधी न झालेली चौथी अटक अशा अनेक मुद्द्यांबाबत संशयकल्लोळ सुरू झाला आहे. पीटरच्या अटकेनंतर आता शीना हत्याकांडात इंद्राणी आणि तिचे आजी-माजी मिळून दोन पती गजाआड अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी वारंवार झालेल्या चौकशीत आधी मुंबई पोलिसांना व नंतर सीबीआयला पीटरने दिलेल्या अनेक तपशिलांमध्ये वा उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पीटरला सीबीआयने सखोल चौकशीसाठी गजाआड केले. 

Web Title: Sheena Bora massacre - Peter Mukherjee, 3-day CBI closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.