शेकडोने वाढ :गिधाडांचे नाशिकच्या आदिवासींकडून संवर्धन
By Azhar.sheikh | Published: August 9, 2017 08:52 PM2017-08-09T20:52:15+5:302017-08-09T20:56:50+5:30
जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो.
अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो. गिधाडच्या प्रजाती भारतातही धोक्यात आल्या आहेत; मात्र नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ह्यखोरीपाडा येथे आदिवासी मागील सहा वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले असून दोन्ही प्रजातींच्या गिधाडांच्या संख्येत शेकडोने वाढ झाली आहे.
गिधाड संवर्धन ही काळाची गरज ओळखून वनविभागाने येथील गावकºयांशी चर्चा करून तत्काळ संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी जागेची पाहणी करुन संरक्षक कुंपण तयार केले आणि त्याला ह्यगिधाड रेस्तरॉँह्ण असे नाव देण्यात आले. हा रेस्तरॉँ चालविण्याची संकल्पनाही अत्यंच आगळीवेगळी अधिकाºयांनी आणि गावकºयांनी शोधून काढली.
सरकारी इच्छाशक्ती असेल आणि त्या इच्छाशक्तीनुसार केलेल्या प्रयत्नांना जर लोकसहभागाची जोड मिळाली, तर निसर्गाचे संवर्धन कशा पध्दतीने होऊ शकते, याचे मुर्तिमंत उदाहरण खोरीपाड्याला भेट दिल्यावर सहज पहावयास मिळते.
पंचक्रोषिमध्ये आवाहन; रेस्तरॉँचा प्रचार
पंचक्रोषित वनविभागच्या अधिकाºयांसह कर्मचाºयांनी आणि संंयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्य शंकर शिंदे यांनी ह्य गिधाड उपहारगृह उपक्रमाची माहिती पोहचविण्यास सुरूवात केली. पंचक्रोषित कुठेही काही आजाराने अथवा अपघाताने जनावर दगावल्यास त्याचा मृतदेह जमिनित न पुरता त्याची माहिती तत्काळ वनविभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला खोरीपाडा, चिंचवड, हरसूल, वाघेरा, नाकेपाडा या पंचक्रोषिमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मृत जनावरांचे मृतदेह येथील रेस्तरॉँमध्ये वैद्यकिय तपासणी करुन आणून टाकले जाऊ लागले.
वनविभाग व अदिवासी आशावादी
प्रारंभी वर्षभर या प्रकल्पाकडे गिधाडे अगदी बोटावर मोजण्याइतकेच आली; मात्र प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळाल्याचे बघून वनविभाग व गावकरी आशावादी होते. त्यांनी ह्य रेस्तरॉ सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न कमी पडू दिले नाही. पंचक्रोषित कुठेही जनावर दगावले तर ते जनावर रेस्तरॉँ पर्यंत आणून गिधाडांना खाद्य उपलब्ध करुन दिले. त्यामुळे गिधाडांना रेस्तरॉँ चांगलाच भावला हळहळू गिधाडे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले. तीन वर्षांमध्ये गिधाडांची संख्या तीनशेपर्यंत पोहचल्याने प्रकल्पाला यश आल्याने समाधान व्यक्त केले गेले.
दोन्ही प्रजातींची शेकडो गिधाडे
सहा वर्षांमध्ये गिधाडांची संख्या जवळपास चारशेच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही प्रजातींच्या गिधाडांचा समावेश आहे. पांढºया पाठीची आणि लांब चोचीची अशा दोन्ही प्रजातीची शेकडो गिधाडे ह्यरेस्तरॉँह्णवर भूक भागविण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. वनविभागाकडून या गिधाड रेस्तरॉँची वेळोवेळी देखभाल दुरूस्ती करण्यावर भर दिला आहे. गिधाडांच्या उपहारगृहात मोकाट कुत्र्यांचा शिरकाव रोखण्यासाठी वनविभागाकडून संरक्षक जाळ्यांची उंची देखील वाढविण्याचा विचार केला जात आहे.