शेट्टींची आत्मक्लेश यात्रा? ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 11:04 PM2017-06-30T23:04:29+5:302017-06-30T23:04:29+5:30

शेट्टींची आत्मक्लेश यात्रा?ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!

Shetty's self-love trip? Sadabhau tribute travel! | शेट्टींची आत्मक्लेश यात्रा? ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!

शेट्टींची आत्मक्लेश यात्रा? ही तर सदाभाऊ क्लेश यात्रा!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : खासदार राजू शेट्टी यांनी काढलेली आत्मक्लेष यात्रा ही शेतकऱ्यांसाठी नव्हती. ती तर मला त्रास देण्यासाठी काढलेली ‘सदाभाऊ क्लेष’ यात्रा होती, असा टोला राज्याचे कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लगावला.
कऱ्हाड येथे आढावा बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्री खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.
मंत्री खोत म्हणाले, खरंतर चळवळीत योगदान नसणाऱ्या लोकांनी शेतकरी संघटनेतील वातावरण गढूळ केले आहे. मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये सहभागी असल्याने मी शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन
काम करीत आहे. त्यामुळे
शेतकरी समाधानी आहेत. पण काहींच्या मते मी त्यांना डोळ्यासमोर ठेऊन काम करायला हवे. तसे मी करीत नसल्याने ते नाराज आहेत. त्याला मी काय करणार, अशी कोपरखळी त्यांनी खासदार शेट्टी यांना मारली.
नुकतीच पुणे येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत तुमच्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या. तुम्हाला ४ जुलैपर्यंत मत मांडण्याचा अल्टिमेटम दिलाय, असे छेडले असता खोत म्हणाले, मी तुमच्या वृत्तपत्रातून ही बातमी वाचली आहे. ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. पण मी संघटनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता असल्याने
मला बैठकीला बोलविले नसेल. मी उत्तर द्यायला, मत मांडायला
तयार आहे. समितीचे लोक
माझ्याकडे आले तर ठिक. नाहीतर ते बोलवतील त्याठिकाणी मी जायला तयार आहे.
मी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करीत असल्याने मी गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे मला चौकटीत राहुनच काम करावे
लागते. मी शरद जोशींच्या विचार सरणीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे कृषीमंत्री म्हणून
काम करताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. ऊस खरेदी कर माफ करणे, बाजार समिती निवडणुकीत थेट शेतकऱ्याला मतदानाचा हक्क देणे अशा अनेक निर्णयाबरोबर शेतकरी कर्जमाफीमध्ये मी महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यामुळे विरोधक काहीही टीका
करीत असले तरी त्याला मी महत्व देत नाही.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी...
विदर्भ मराठवाड्यात पाऊस नाही. तेथील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. याबाबत विचारले असता सदाभाऊ खोत म्हणाले, याबाबत त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल प्राप्त होताच योग्य तो निर्णय घेतला जाईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील, असेही यावेळी सदभाऊ खोत म्हणाले.

Web Title: Shetty's self-love trip? Sadabhau tribute travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.