शि. द. फडणीस

By admin | Published: May 5, 2016 05:04 AM2016-05-05T05:04:05+5:302016-05-05T05:04:05+5:30

शि.द. फडणीस यांची व्यंग्यचित्रे बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या व्यंग्यचित्रांमुळे चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली. आपल्या ठसठशीत आणि

Shi The Phadnis | शि. द. फडणीस

शि. द. फडणीस

Next

शि.द. फडणीस यांची व्यंग्यचित्रे बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या व्यंग्यचित्रांमुळे चित्रकला सामान्यांपर्यंत पोहोचली. आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी पाच दशकांहून अधिक वर्षे वाचकांना हसवले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणिसांच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली.

Web Title: Shi The Phadnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.