शि. प्र. मंडळीच्या दाढेंसह चौघांना पोलीस कोठडी
By Admin | Published: March 31, 2016 12:45 AM2016-03-31T00:45:35+5:302016-03-31T00:45:35+5:30
शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बनावट मतपत्रिका तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावे खोटी पाकिटे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अभय दाढे यांच्यासह
पुणे : शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बनावट मतपत्रिका तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या नावे खोटी पाकिटे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अभय दाढे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. कुलकर्णी यांनी चौघांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दामोदर बद्रीनारायण भंडारी (वय ५५, रा. वडगाळ मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभय दाढे (वय ५०, रा. सदाशिव पेठ) यांच्यासह जयंत शाळीग्राम (वय ५१, रा. भोसलेनगर, गणेशखिंड), प्रकाश कृष्णाजी जोशी (वय ७३, रा. सोलापूर) आणि स्वप्निल यशवंत दळवी (वय ३२, रा. सदाशिव पेठ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
३३ टक्के मतदान, आज मतमोजणी
पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या निवडणुकीसाठी ३३ टक्के मतदान झाले असून उद्या (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. पुण्यासह मुंबई आणि सोलापूर येथे शांततेत मतदान झाले. पोस्टाने पाठविलेल्या परंतु पत्ता बदलल्याने किंवा पत्ता न सापडल्याने परत आलेल्या मतपत्रिकांची संख्या २०४ आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर गायकवाड यांनी दिली.