शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना परदेशात जाण्यास परवानगी
By admin | Published: June 14, 2017 01:06 AM2017-06-14T01:06:06+5:302017-06-14T01:06:06+5:30
व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना न्यायालयाने देशाबाहेर जाण्यास मनाई
- लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना न्यायालयाने देशाबाहेर जाण्यास मनाई केली होती. परंतु नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शेट्टी दाम्पत्यास परदेशात जाण्यास परवानगी दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा व भागीदार दिर्शत इंद्रवन शाह, उदय कोठारी यांनी बेस्टडील टीव्ही प्रा. लि. ही आॅनलाइन कंपनी सुरू केली. ग्राहकांकडून बेडशीटची आॅर्डर ते घेत होते. त्यांच्या बेडशीटची आॅर्डर भलोटिया एक्स्पोर्ट कंपनीने जुलै २०१५ ते मार्च २०१६दरम्यान पूर्ण केली. मात्र आॅनलाइन ग्राहकांना बेडशीट विक्र ी करून आलेली २४ लाख १२ हजार ८७७ रु पये भलोटिया एक्स्पोर्ट कंपनीस मिळाली नाही, अशी तक्रार कंपनीचे मालक रवी भलोटिया यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी राज कुंद्रा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवल्यानंतर राज यांनी वकिलासह कोनगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टी, राज यांच्यासह कोठारी यांना ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
खटल्यादरम्यान शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, उदय कोठारी यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई केली होती. परंतु कामानिमित्ताने तिघांनी परदेशात जाण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असता ठाणे न्यायालयाने कोठारी यांना परदेशी जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या अर्जावर ६ जूनला सुनावणी देताना २१ जुलैपर्यंत परदेशात जाण्याची परवानगी दिली.