शिल्पग्रामला उर्जितावस्थेची गरज

By admin | Published: April 3, 2015 09:32 PM2015-04-03T21:32:32+5:302015-04-04T00:10:54+5:30

प्रकल्प बंद असल्यामुळे पर्यटकांची पाठ सावंतवाडीच्या समस्या

Shilpagram has a need for Urgita Vastha | शिल्पग्रामला उर्जितावस्थेची गरज

शिल्पग्रामला उर्जितावस्थेची गरज

Next

प्रसन्न राणे - सावंतवाडी  विदेशातील पर्यटकांनी केलेल्या सफरीतील आकर्षण असलेल्या सावंतवाडीतील शिल्पग्राम या पर्यटनस्थळाचा आनंद अनेकवेळा जिल्ह्यासह विदेशातील पर्यटकांनी लुटला आहे. मात्र, हे स्थळ मागील काही वर्षांपासून बंदावस्थेत असल्याने या स्थळाचे आकर्षण नष्ट होताना दिसत आहे. प्रशासनाने या स्थळाच्या सांैदर्याला पुन्हा नवीन झळाळी देत प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून साडेतीन कोटी रुपये खर्च करून शिल्पग्राम प्रकल्प उभारण्यात आला आहे. विविध चित्ररथ, फिल्म सिनेमागृह, पर्यटकांना राहण्यासाठी घरे, तंबू, तलाव, रेस्टॉरंट, हॉल अशा प्रकारच्या अनेक सोयीसुविधा या शिल्पग्राममध्ये पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी दुर्लक्ष झाल्याने शिल्पग्राममधील काही सामानाची नासधूस झाली आहे. पर्यटकांना राहण्यासाठी उभारलेल्या घरातील सामानाची चोरी तसेच काही सामानाची तोडफोडही झाली होती. यानंतर या ठिकाणी सावंतवाडी नगर परिषदेने हा परिसर स्वच्छ करून ठेवल्याचे दिसून येत आहे.
याठिकाणी पर्यटनदृष्ट्या कोणताही उपक्रम राबविण्यात आल्याचे दिसून येत नाही. सावंतवाडीत अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्वांची पाहणी करून शिल्पग्राममध्ये उत्तम अशी पर्यटकांसाठी राहण्याची व अन्य सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आता या बंद सुविधा सुरू करणे आवश्यक आहे.
शिल्पग्राममध्ये या अगोदर अनेक पर्यटकांचा प्रतिसाद लाभला आहे. देश-विदेशातून अनेकवेळा शिल्पग्रामात पर्यटक आनंदोत्सव साजरा करून गेलेले आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेने या अगोदर लाखो रुपये खर्च करून तीन वेळा विदेशी पर्यटकांचे आयोजनही केले होते. दरम्यान, अनेक स्थानिक नागरिकांनीही या शिल्पग्रामचा आस्वाद घेतला होता. मात्र, त्यानंतरच्या काळात शिल्पग्रामात प्रवेश बंद केल्याने आजपर्यंत शिल्पग्राम त्याच स्थितीत आहे.


शिल्पग्राम इच्छुक एजन्सीकडे देणार
शिल्पग्राम येणाऱ्या पर्यटकांसाठी अगोदरपासूनच सुरू आहे. मात्र, त्यांच्याकरिता बांधण्यात आलेली घरे एजंटअभावी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, ही घरे पुन्हा दुरुस्त करून इच्छुक एजन्सीकडे देण्याचा मानस आहे. याकरिता काही एजंटशी बोलणे झाले असून येत्या सहा महिन्यात शिल्पग्राम पूर्ववत बनविण्यात येणार आहे.
- बबन साळगावकर, नगराध्यक्ष, सावंतवाडी
प्रकल्प शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे व्हावे
सावंतवाडी शहरात शासन मान्यतेनुसार मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र, शासनाने सामान्य जनतेला परवडणारे शुल्क लावले पाहिजे तरच याचा विकास होईल. शिल्पग्रामसह शहरातील सर्व प्रकल्पांची प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात लादलेले शुल्क कमी करुन स्थानिकांना प्रकल्प चालविण्यास परवडेल असे शुल्क ठेवले पाहिजे. प्रकल्प करुन झाल्यास गोवा, कर्नाटक येथील पर्यटकांना याचा फायदा होणार आहे.
- गोविंद वाडकर, नगरसेवक, सावंतवाडी

Web Title: Shilpagram has a need for Urgita Vastha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.