राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:16 PM2022-09-26T18:16:04+5:302022-09-26T18:40:25+5:30

'पोलीस भरतीसंदर्भात 8 हजारांची अॅड आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकरच निघेल.'-देवेंद्र फडणवीस

Shinde-Fadanvis government; Recruitment of 20 thousand police soon, informed by Deputy Chief Minister Devendra Fadanvis | राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

राज्य सरकारचा मोठा निर्णय; लवकरच 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Next

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सायबर सेक्युरिटी, तुरुंगातील कैद्यांची अवस्था यावर भाष्य केले. तसेच, वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांनाही टोला लगावला. यासोबतच, पोलीस विभागातील भरतीबाबत मोठी माहिती दिली. राज्यात 20 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

20 हजार पोलिसांची भरती
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लवकरच राज्यात 20 हजार रिक्त पोलिसांची भरती होईल. 8 हजारांची एक जाहिरात आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकर काढू. या भरतीमुळे पोलिस विभागावरील मोठा ताण कमी होईल,' असे फडणवीस म्हणाले. 

कैद्यांसाठी खास सुविधा
यावेळी त्यांनी तुरुंगातील कैद्यांबाबतही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, 'राज्यातील तुरुंग विभागात सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या तुरुंगात 1641 असे कैदी आहेत, ज्यांची बेल झाली आहे, पण बेलबाँड करण्यासाठी त्यांच्याकडे व्यक्ती किंवा पैसे नसल्यामुळे ते तुरुंगातच आहे. अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही काही एनजीओची मदत घेणार आहोत,' अशी माहिती त्यांनी दिली. 

सायबर सेक्युरिटीबाबत निर्णय

तसेच, 'राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशींगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करत असून, लवकरच राज्यात सायबर सेक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत. तसेच, जागरुकतेसाठी एक कँपेनदेखील हाती घेत आहोत,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Shinde-Fadanvis government; Recruitment of 20 thousand police soon, informed by Deputy Chief Minister Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.