शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 01:20 PM2023-01-07T13:20:39+5:302023-01-07T13:22:09+5:30

एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

Shinde-Fadnavis government will not see February; Shiv sena MP Sanjay Raut's big claim | शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा

googlenewsNext

नाशिक  - चित्र हळू हळू बदलतेय. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण परिवर्तनाच्या दिशेने जात आहे. २०२४ ची तयारी सुरू आहे. पण त्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे माझे मत पक्के आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव येईल वाटत नाही. संविधान, घटना आणि कायदा याचे उल्लंघन करणारे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही असा दावा शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, १६ आमदार अपात्र ठरतील. केवळ वेळकाढूपणाचं धोरण स्वीकारलं आहे. सरकार व्हेटिंलेटरवर असून ते सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर हे राम होईल. कुणी त्यांच्यासोबत राहणार नाही. आता हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना सामोरे जायचं याची प्रतिक्षा राज्यातील जनता करतेय. अधिवेशन काळात सरकारचा जो गोंधळ होता तो जवळून पाहता आला. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येऊनही सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे बसून होतं. या राज्यात सरकार अस्तित्वात नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत अनेक प्रकरण अधिवेशन काळात समोर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हैशीसारखे जणू काही घडलेच नाही आणि विरोधी पक्षच जबाबदार आहे अशा पद्धतीने काम करते. पूर्वी हायकोर्टाने ताशेरे मारले तरी मंत्री राजीनामा द्यायचे. पण एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह ६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरण समोर आली तरी सरकार ठोंब्याप्रमाणे बसून आहे. ४० आमदारांसाठी हे सरकार आहे असा टोला संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला. 

शिवसेना एकच, गट-तट तात्पुरते
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना. शिवसेना एकच आहे. गट-तट हे तात्पुरते आहे. शिवसेना एकच आहे. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्या शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. शिवसेना हा महावृक्ष आहे. त्याचे बीज बाळासाहेबांनी रोवले. महावृक्ष फोफावतो, वाढतो. पाचोळा पडतो. कचरा पडतो तो कचरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वेचून नेला जातोय. त्यांच्यासमोर मुख्यमंत्री भाषण करतात. कचरा आग लावण्यासाठी असतो. या कचऱ्याचा धूर फार काळ राहत नाही असंही संजय राऊतांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे. 
 

Read in English

Web Title: Shinde-Fadnavis government will not see February; Shiv sena MP Sanjay Raut's big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.