Maharashtra Political Crisis: वेदनादायी! घरात दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही कर्तव्यनिष्ठा जपत दादा भुसेंची शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 03:15 PM2022-08-10T15:15:18+5:302022-08-10T15:17:28+5:30

दादा भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात दुःखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.

shinde fadnavis govt cabinet minister dada bhuse was taking oath as minister niece passed away at malegaon | Maharashtra Political Crisis: वेदनादायी! घरात दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही कर्तव्यनिष्ठा जपत दादा भुसेंची शपथ 

Maharashtra Political Crisis: वेदनादायी! घरात दुःखाचा डोंगर कोसळला; तरीही कर्तव्यनिष्ठा जपत दादा भुसेंची शपथ 

googlenewsNext

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. नाशिकमधून शिंदे गटात सामील झालेले आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांची मंत्री मंडळात वर्णी लागली. या मंत्रिमंडळ विस्तारात तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. दादा भुसेंसह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना एका बातमीने दादा भुसेंच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणार्धात आनंदावर विरजण पडले.

नाशिकचे तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांना देखील कॅबिनेट पदी विराजमान होता येणार आहे. दादा भुसे मंत्रिपदाची शपथ घेत असताना घरात विवाहित पुतणीचे निधन झाल्याची वार्ता कळली. त्यानंतर दादा भुसेंसह परिवार शोकसागरात बुडाला.  शपथविधीच्या आदल्या दिवशी सायंकाळपर्यंत ते घरीच होते. रात्री उशिरा त्यांना मुंबईहून फोन आला. त्यांना तातडीने निघावे लागले. घरात अशी परिस्थिती असताना मनावर दगड ते मुंबईला शपथविधीसाठी पोहचले. 

भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू

आमदार दादा भुसे यांचे बंधू दत्तू भुसे यांची विवाहित मुलगी भाग्यश्री संदीप पाटील यांचे निधन झाले. याचवेळी दादा भुसे यांना मुंबई गाठावी लागली. दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे भुसे कुटुंबियांच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत होते. दादा भुसेंच्या मंत्रिपदाच्या आनंदाला दुःखाची किनार  होती. भुसे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मालेगावी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. अनेकांनी ढोल ताशे, पेढे खाऊ घातले. 

दरम्यान, या मंत्रिमंडळात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या शपथेवरून विरोधकांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. मात्र, दोघांची निवड योग्य कशी योग्य आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. 
 

Web Title: shinde fadnavis govt cabinet minister dada bhuse was taking oath as minister niece passed away at malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.