Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचं हसं करुन घेणं योग्य नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:44 AM2023-01-25T11:44:16+5:302023-01-25T11:45:38+5:30
Maharashtra News: आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी, असा सल्ला शिंदे गटाकडून देण्यात आला आहे.
Maharashtra Politics: राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाला. तसेच मुख्यमंत्र्यांनी दावोस दौऱ्यात नेमके काय केले? याचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, रोज काहीतरी बोलून स्वतःचे हसे करुन घेणे योग्य नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. आदित्य ठाकरे यांना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचे आणि स्वत:चे हसे करून घ्यायचे, हे योग्य नाही. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे, खात्री करून घ्यावी, असा सल्लाही दीपक केसरकर यांनी दिला.
हा पंतप्रधानांचा अपमान ठरल असता
जगभरातील लोक दावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असे होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत. दावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कमर्शियल विमानाचे तिकीट बूक करण्यात आले होते. दावोसमध्ये ३७ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी अनुपस्थित राहणे, हे योग्य नव्हते. हा पंतप्रधानांचा अपमान ठरल असता, असे दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास दावोसमध्ये होते आणि ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. त्यांना भेटायला अनेक देशांचे प्रमुख आले होते, त्यालासुद्धा हिणवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंकडून करणयात आला. यावरून महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर गेले आहे, याचा विचार केला पाहिजे, अशी टीका करण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"