'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 01:33 PM2023-06-22T13:33:14+5:302023-06-22T13:40:18+5:30

ईडीच्या या कारवाईवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Shinde group leader Sanjay Shirsat has commented on the ongoing action of ED. | 'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

'तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय म्हणून...'; ईडीच्या धाडीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

googlenewsNext

ईडीने बुधवारी मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे. ठाकरे गटाने गद्दार दिन साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने मुंबईत मोठे ऑपरेशन राबविले आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर एकापाठोपाठ एक छापे टाकण्यात आले. 

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. पाटकर यांच्याशी संबंधित १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयांवरही छापेमारी सुरु आहे. ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

ईडीच्या या कारवाईवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालपासून महाराष्ट्र काही विरोधी पक्षाचे नेते खळबळजनक वक्तव्य करत आहेत. ईडीची धाड एका दिवसात पडत नाही. विरोधकांना वाटतं धाडी आम्ही टाकल्या. जर भष्टाचार केला नसेल तर घाबरायचं काही कारण नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ईडीच्या धाडी एखाद्या राजकीय पक्षाने सांगितल्या म्हणून पडतात असं नाही. आतापर्यंत शरद पवार, राज ठाकरे, जयंत पाटील यांनाही नोटीस दिली होती. तुम्ही काहीतरी काळबेरं केलंय, म्हणून तुम्हाला याची भीती वाटत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, ईडीच्या या कारवाईवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरज चव्हाण यांच्यावर कारवाई केली जात आहे. अशाने शिवसैनिकांचा खच्चीकरण होणार नाही. घाणेरड्या वृत्तीने अशा प्रकारे कारवाई केली जात आहेत. राजकीय द्वेषापोटी गाडलेला मड उखडून काढण्याचा काम सरकारने सुरु केलेलं आहे. शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव आणि आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची सुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे. 

Web Title: Shinde group leader Sanjay Shirsat has commented on the ongoing action of ED.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.