Maharashtra Karnataka Border Dispute: “राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 08:10 PM2022-12-07T20:10:37+5:302022-12-07T20:11:32+5:30

Maharashtra Karnataka Border Dispute: तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तेव्हा काय केले? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, या शब्दांत शिंदे गटाने पलटवार केला आहे.

shinde group leader vijay shivtare criticizes ncp chief sharad pawar and sanjay raut over maharashtra karnataka border dispute | Maharashtra Karnataka Border Dispute: “राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले!

Maharashtra Karnataka Border Dispute: “राऊतांना उपचारांची गरज, पवार ४८ तासांत बेळगावला जाऊन काय दिवे लावणार?”; शिंदे गटाने डिवचले!

googlenewsNext

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यातही कर्नाटकच्या बसेस लक्ष्य करण्यात आले. सीमाप्रश्नाचे पडसाद लोकसभेतही उमटल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या अल्टिमेटमवरुन शिंदे गटाच्या नेत्याने पवार यांना डिवचले असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही बोचरी टीका केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळे वळण देण्याचे काम केले जात आहे. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल. हे प्रकरण येत्या ४८ तासांत संपले नाही, तर मला बेळगावात जावे लागेल. तेथील स्थानिकांना धीर द्यावा लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले. यावर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर पलटवार केला आहे. 

तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता तेव्हा काय केले? 

शरद पवार यांनी दिलेल्या अल्टिमेटवर बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, ४८ तासांत बेळगावला जाऊन तुम्ही काय दिवे लावणार? तुम्ही चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तेव्हा तुम्ही काय केले? हे फक्त राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे शरद पवार यांच्या भूमिकेवर बोलतांना विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊतांना स्किझोफ्रेनिया झाला आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, अशी टीकाही शिवतारे यांनी केली. शरद पवार आणि संजय राऊत यांच्याविषयी बोलत असतांना शिंदे गटाच्या नेत्याने शिंदे-फडणवीस सरकार चांगलं काम करत असल्याचा दावा केला आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांनी आव्हान देऊ नये, राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये, अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: shinde group leader vijay shivtare criticizes ncp chief sharad pawar and sanjay raut over maharashtra karnataka border dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.