Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 04:43 PM2022-09-16T16:43:41+5:302022-09-16T16:44:26+5:30

देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली होती.

shinde group mla abdul sattar made clear statement about dispute with dcm devendra fadnavis | Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला खरंच झापलं का? अब्दुल सत्तारांनी सांगितली बैठकीची इनसाइट स्टोरी!

googlenewsNext

Maharashtra Politics: अलीकडेच भर मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सर्वांसमोर चांगलेच सुनावल्याची बातमी आली होती. यानंतर पुन्हा एकदा शिंदे गटावर भाजपचे असलेले वर्चस्व, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र, त्या बैठकीत नेमके काय घडले, देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय सांगितले, याबाबत खुद्द मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली असून, खडाजंगी वगैरे काही झाली नसल्याचे सांगत या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची बोलण्याची पद्धत आणि माझी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मी बोलतो ते एकदम रफ टफमध्ये, ते अगदी चौकटीत बसणारे बोलतात. ते वेल एज्युकेटेड आहेत, अॅडव्होकेट आहेत. धोरणात्मक निर्णय थेट माध्यमांजवळ जाहीर करु नये, असे  देवेंद्र फडणवीसांनी मला हसता हसता सांगितले. मी ही माझी बाजू त्यावेळी त्यांच्यासमोर मांडली. त्यानंतर त्यांनी कोणताही निर्णय जाहीर करताना आमच्याशी चर्चा करावी, अशी सूचना केली.  त्यांच्या बोलण्याचा उद्देश हा होता की बजेटमध्ये आपण त्याची तरतूद केली असती, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. 

बैठकीत कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही

त्यावेळी धोरणात्मक निर्णयाची घोषणा केलेली नव्हती. फक्त माझ्या मनातला विचार माध्यमांजवळ बोलून दाखवला होता. पण विविध माध्यमांनी शासन निर्णय म्हणून संबंधित वृत्त चालवले. त्यामुळे चुकीचा मेसेज गेला. पण शेवटी आम्ही आमच्या मनातील कल्पना जरी सांगितली तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय पुढे काही होत नसते, हे सत्य आहे. मागच्या आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा हसता हसता त्यांनी मला सल्ला दिला . कोणतीही खडाजंगी वगैरे झाली नाही, असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार यांनी दिले. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार असल्याचं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. माध्यमांनीही योजनेचा आवाका आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन कृषी विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त चालवले. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसताना, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना संबंधित योजनेची माहिती नसताना तुम्ही कसा काय निर्णय जाहीर करु शकता? असा सवाल करत फडणवीसांनी सत्तारांना धारेवर धरले. देवेंद्र फडणवीसांनी खडे बोल सुनावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तारांना समज दिली.

Web Title: shinde group mla abdul sattar made clear statement about dispute with dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.