Maharashtra Politics: “राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही, पवारसाहेब यांना आवरा”; शिंदे गटातील नेत्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 09:18 AM2023-01-05T09:18:11+5:302023-01-05T09:19:08+5:30

Maharashtra News: राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांबाबत शिंदे गटाच्या नेत्याने थेट शरद पवारांना साकडे घातले आहे.

shinde group sanjay gaikwad appeals to sharad pawar about ncp leaders statement over chhatrapati sambhaji maharaj and aurangzeb | Maharashtra Politics: “राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही, पवारसाहेब यांना आवरा”; शिंदे गटातील नेत्याचे आवाहन

Maharashtra Politics: “राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही, पवारसाहेब यांना आवरा”; शिंदे गटातील नेत्याचे आवाहन

Next

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून अद्यापही राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आवाहन करत, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवरा, अशी विनंती केली आहे. 

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला आहेत. तसेच या नेत्यांना आवरण्याचे आवाहन शरद पवार यांना केले आहे. वडिलांना तुरुंगात डांबणारा औरंगजेब कोण होता? तो क्रूर नाहीये? त्याचा सत्कार केला पाहिजे? त्याने आमच्या राजाला मारले नाही? या लोकांना विधान करताना लाज वाटली पाहिजे, या शब्दांत संजय गायकवाड यांनी हल्लाबोल केला. 

शरद पवार यांना विनंती आहे, यांना आवरावे

औरंगजेब बादशाहने अनेक वर्ष भारतावर राज्य केले. त्याने राज्य मिळवण्यासाठी आपल्या सख्या मोठ्या भावाची गर्दन कापली. वडिलांना तुरुंगात टाकले. सर्व भावांचा खात्मा करून गादी बळकावली. त्याने काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडण्याचे फर्मान सोडले. जगात झाले नाही एवढे धर्मांतर औरंगजेबाने करून घेतले. तरीही तो क्रूर नाही असे कसे म्हणता? अशी विचारणा करत, औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांचे हाल केले. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांना लाज वाटत नाही. एवढ्या क्रूरपणे वागणाऱ्या बादशाहाला ते चांगला असल्याचे सर्टिफिकेट देत आहेत. असे करून ते आमच्या थोर राजांचा अपमान करत आहेत. माझी शरद पवार यांना विनंती आहे. त्यांनी या थोबाडांना आवरावे,  असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, औरंगजेब क्रूर नव्हता असे म्हटलेच नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. औरंगजेब क्रूरच होता. त्यात वादच नाही. माझे विधान एका मंदिराशी संबंधित होते. औरंगजेबाने ते पाडले नव्हते. त्याचे पुरावे मी लवकरच देईन, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shinde group sanjay gaikwad appeals to sharad pawar about ncp leaders statement over chhatrapati sambhaji maharaj and aurangzeb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.