Maharashtra Gram Panchayat Result : शिंदे गटाचे प्रवक्ते अन् मंत्री केसरकरांना धक्का; ठाकरे गटाचा दोन ग्रामपंचायतींवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:26 AM2022-12-20T11:26:03+5:302022-12-20T11:27:13+5:30
Maharashtra Gram Panchayat Election Result: तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे.
सावंतवाडी-
तालुक्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागले असून आजगाव भोमवाडी ग्रामपंचायतमध्ये ठाकरे गटानं खातं उघडलं आहे. सरपंचपदी अनुराधा वराडकर निवडून आल्या आहेत. तर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ही ग्रामपंचायत अनेक वर्षे शिंदे गटाचे माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या ताब्यात होती.
सर्वाधिक सरपंच कोणाचे? ठाकरे गटाने शिंदे गटाला पछाडले; काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम
या ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सावंतवाडी तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दहा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये मडूरा केसरी शिरशिंगे पडवे माजगाव या ग्रामपंचायतवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
ज्यांनी गुजरात जिंकवले, ते ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा पराभव!
तर गावविकास पॅनेल ने गुळदुवे व निरगुडे गाव विकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर तसेच शिवसेना ठाकरे गटाने भोमवाडी तसेच सातार्डा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम