सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 09:06 AM2024-05-20T09:06:15+5:302024-05-20T09:07:23+5:30

कशाला पर्वा उकाड्याची, निभावू जबाबदारी मतदानाची

Shindesena VS Uddhavsena in six places; Voting today in 13 constituencies of the state in the fifth phase of Lok Sabha elections | सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान

सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान

दीपक भातुसे

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी १३ मतदारसंघांत मतदान होत आहे. या १३ पैकी ६ लोकसभा मतदारसंघांत शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना यांचे उमेदवार एकमेकांसमोर लढत आहेत. ३ मतदारसंघांत भाजप विरुद्ध काँग्रेस, २ मतदारसंघांत भाजप विरुद्ध शरद पवार गट आणि २ मतदारसंघांत भाजप विरुद्ध उद्धवसेना असा मुकाबला होणार आहे. 

शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीकडून १३ पैकी सर्वाधिक ८ मतदारसंघांत उद्धवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत, तर काँग्रेसचे ३ आणि शरद पवार गटाचे २ उमेदवार रिंगणात आहेत.  महायुतीकडून भाजपचे सर्वाधिक ७, तर शिंदेसेनेचे ६ उमेदवार लढत आहेत. अजित पवार गटाचा एकही उमेदवार या शेवटच्या टप्प्यात निवडणूक रिंगणात नाही.

४१,८९७ - बॅलेट युनिट
२४,५७९ - कंट्रोल युनिट 
२४,५७९ - व्हीव्हीपॅट

१६० - मतदान केंद्रे राज्यामध्ये संवेदनशील.
१०० - मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी
१२ - पुरावे मतदार ओळखपत्रा-शिवाय मतदानासाठी ग्राह्य

काय आहे पक्षीय बलाबल? 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर झालेल्या पक्षफुटीचे चित्र पाहिले तर या १३ मतदारसंघांपैकी ३ (मुंबई दक्षिण, ठाणे, पालघर) मतदारसंघातील खासदार उद्धवसेनेकडे आहेत, तर ४ (मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, कल्याण, नाशिक) मतदारसंघातील खासदार शिंदेसेनेबरोबर आहेत. 
- मागील निवडणुकीत १३ पैकी भाजपने ६ (मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, भिवंडी, दिंडोरी, धुळे) जागा जिंकल्या होत्या.
- शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना लढत - ६ मतदारसंघ
नाशिक, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण  
- भाजप विरुद्ध काँग्रेस लढत - ३ मतदारसंघ
धुळे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-मध्य  
- भाजप विरुद्ध शरद पवार गट लढत - २ मतदारसंघ
दिंडोरी, भिवंडी  
- भाजप विरुद्ध उद्धव सेना - २ मतदारसंघ
पालघर, मुंबई उत्तर पूर्व

Web Title: Shindesena VS Uddhavsena in six places; Voting today in 13 constituencies of the state in the fifth phase of Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.