शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला ८ कोटींची मलमपट्टी!

By Admin | Published: December 24, 2016 10:40 PM2016-12-24T22:40:18+5:302016-12-24T22:40:18+5:30

शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला आठ कोटींची मलमपट्टी करण्याची वेळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीवर आली.

Shirdi airport runway bundle with 8 crores! | शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला ८ कोटींची मलमपट्टी!

शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला ८ कोटींची मलमपट्टी!

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

शिर्डी, दि. 24 -  हौशी वाहनचालकांनी धावपट्टीवर वाहने पळविल्याने विमान उड्डाणाच्या आधीच शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीला आठ कोटींची मलमपट्टी करण्याची वेळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीवर आली. त्यामुळे उड्डाणही लांबणीवर पडला. गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी विमानतळाचे काम सुरू आहे़ अडीच किमी लांब व ४५ मीटर रुंदीची भव्य धावपट्टी जवळपास तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली आहे.

मात्र भूसंपादनाचे काही विषय रेंगाळल्याने व कंपाउंडचे काम अर्धवट राहिल्याने धावपट्टी बेवारस पडली़ अनेकांनी दुचाकी व चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले, याच धावपट्टीवर तरुणांनी मोटारसायकलचे स्टंट अनुभवले, तर काही बेवड्यांनी येथे चक्कपार्ट्या करून हवाई सफर केली़संगमनेरलामधल्या रस्त्याने जाणारे थेट या धावपट्टी वरूनच जात़ विमानाचा स्वर्गीय स्पर्श अनुभवण्यापूर्वी या धावपट्टींच्या नशिबी मोटारसायकल, रिक्षा, टेम्पोपासून बैलगाडीची वहिवाट आली़ त्यातच यंदा वरूणराजानेही या दुष्काळी टापूवर मेहरनजर केली़ यामुळे या धावपट्टीचा पृष्ठभाग खडबडीत झाला व अनेक ठिकाणी खडी उखडून खड्डेही पडले.

विमानतळ सुरू करण्यासाठी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या केलेल्या पाहणीत उखडलेल्या धावपट्टीवर आक्षेप घेत एखादा खडा उडाला, तरी आम्हाला कोट्यवधींचा भुर्दंड बसेल, असे सांगितले़ यामुळे आता या धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी आठ कोटींचे टेंडर काढण्यात आले असून, रात्रंदिवस रिकोटिंगचे काम सुरू आहे़ त्याचबरोबर टर्मिनलचेही विस्तारीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, फायर फायटिंगचे काम अंतिम टप्प्यात आहे़

जानेवारीत विमानाच्या उड्डाणाची शक्यता
१५ जानेवारीपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक विश्वास पाटील यांनी दिल्याचे कार्यकारी अभियंता रजनी लोणारे व अभियंता अमर खोत यांनी सांगितले़ विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना आणण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे़ जानेवारीत हा विमानतळ रण होण्याची शक्यता असून, कामाची निकड लक्षात घेऊन, रजनी लोणारे यांना नागपुरहून येथे आणण्यात आले आहे़

Web Title: Shirdi airport runway bundle with 8 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.