शिर्डीत लाडू कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Published: June 29, 2017 01:41 AM2017-06-29T01:41:45+5:302017-06-29T01:41:45+5:30
पगार न मिळाल्याने शिर्डीत साईबाबांचा प्रसाद लाडू बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे काउंटरवर भक्तांना लाडू मिळाले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : पगार न मिळाल्याने शिर्डीत साईबाबांचा प्रसाद लाडू बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे काउंटरवर भक्तांना लाडू मिळाले नाहीत.
भक्त साईबाबांचा लाडू प्रसाद घेऊन जात असतात. प्रसादाची पॅकिंग करण्याचा ठेका नाशिकच्या कंपनीस देण्यात आलेला आहे. ठेकेदाराने लाडू बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने या कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन करून प्रसादालयाजवळ ठिय्या आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसल्याने आर्थिक टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. साईबाबांचे काम असल्याने आम्ही संयम ठेवत काम केले. मात्र संबंधित ठेकेदार आज उद्या करीत पगार देण्यास टाळाटाळ करीत आहे.