शिर्डी संस्थानचं बाहुबली "प्रभास"ला साकडं
By admin | Published: July 6, 2017 04:43 PM2017-07-06T16:43:47+5:302017-07-06T16:57:01+5:30
शिर्डी संस्थान सध्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरच्या शोधात असून यासाठी बाहुबली चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभासला साकडं घालण्यात आलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 6 - शिर्डी संस्थान सध्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरच्या शोधात असून यासाठी बाहुबली चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्रभासला साकडं घालण्यात आलं आहे. साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी शिर्डी संस्थानाने जोरदार तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून ब्रॅण्ड अॅम्बेसेडरची निवड केली जात आहे. शिर्डी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली आहे.
आणखी वाचा -
शिर्डी संस्थानचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यासाठी प्रभासोबत अजून दोन मोठी नावं चर्चेत आहेत. यामध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, अभिनयाचा बादशाह अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. नावं चर्चेत असली तरी अद्याप यापैकी कोणाशीही संपर्क झालेला नाही. शिर्डी संस्थानकडून या सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती सुरेश हावरे यांनी दिली आहे.
शिर्डी भारतातील प्रमुख देवस्थानांपैकी एक असून फक्त देशभरातूनच नाही, तर परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात.
शिर्डीत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार
साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना सरकार व संस्थान पुरेशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहे़ शताब्दीसाठी निधी देण्याऐवजी केवळ प्रस्तावाला मान्यता दिली़ त्याचा निषेध करण्यासाठी ८ जुलैला शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
साई संस्थानला वेळोवळी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेटून तसेच भावनांची तीव्रता निदर्शनास आणून देण्यासाठी आंदोलन करूनही संस्थान सुस्त आहे़ त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामसभा घेतली. शताब्दी व शहरविकासाची कामे तातडीने सुरू करावी व आठ दिवसांत संस्थान अध्यक्षांनी ग्रामस्थांशी चर्चा करावी. अन्यथा विश्वस्त मंडळास शिर्डीत पाय ठेवू देणार देणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी दिला होता.
डॉ. एकनाथ गोंदकर यांनी संस्थान व ग्रामस्थांत संवाद राहिला नसल्याचे सांगत कोणतेही काम सुरू नसल्याचा आरोप केला होता. आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले़ व्यवस्थापन व प्रशासन एकमेकांवर अपयशाचे खापर फोडत असल्याचे सांगण्यात येते.