शंकराचार्याच्या वक्तव्याने शिर्डी संतप्त
By admin | Published: June 24, 2014 01:01 AM2014-06-24T01:01:51+5:302014-06-24T01:01:51+5:30
द्वारकेच्या शंकराचार्यानी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतिक असण्यावर आक्षेप नोंदवल्याची सोमवारी देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली.
Next
>शिर्डी : द्वारकेच्या शंकराचार्यानी साईबाबांच्या देवत्वावर व ते हिंदू-मुस्लिमांचे प्रतिक असण्यावर आक्षेप नोंदवल्याची सोमवारी देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली. संतप्त शिर्डीकरांनी शंकराचार्याच्या प्रतिमेचे दहन केले तर शंकराचार्यानी विधान मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
साईबाबांच्या हयातीत अब्दुल बाबा, बडे बाबा, अमीर शक्कर, जव्हार अली, सिद्दी फाळके यांसारखे हज यात्र केलेले मुस्लीम साईभक्त होत़े साईबाबांनी शंभर वर्षापूर्वी रामनवमी व उरुस एकाच दिवशी करण्याची प्रथा सुरू केली़ रोज सकाळी साईंच्या समाधीवर अब्दुल बाबांचे वंशज फुले वाहतात़ द्वारकामाईत मशिदीत बाबांनी हयात घालवली. तेथे हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणून केशरी व हिरवा ध्वज लावण्यात येतो़, असे असतानाही शंकराचार्यानी आक्षेप का घेतला असा सवाल साईभक्त करत आहेत.
आम्ही साईबाबांचा सदैव आदर करतो, बाबा मोठे संत असून ते हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतिक असल्याचे मत येथील मौलाना असगरअली यांनी व्यक्त केल़े मानव धर्माचा उपदेश करणा:या साईबाबांची ‘सबका मालिक एक’ ही शिकवणच आज देश एकसंघ ठेवण्यास व जातीय सलोखा राखण्यासाठी महत्त्वाची असल्याचे संस्थानचे माजी प्रशासकीय अधिकारी सुभाष जगताप यांनी सांगितले.
सिंगापूर येथील भाविक प्रतिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बाबांविषयी कोणीही काहीही वक्तव्य केले तरी आमच्या श्रद्धेत फरक पडणार नाही. (वार्ताहर)
हे सर्वधर्म समभावाचे ठिकाण आह़े साठ वर्षे बाबांनी येथे एका पडक्या मशिदीत वास्तव्य केल़े लाखो भाविकांची बाबांवर निस्सीम श्रद्धा आह़े संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करून श्रद्धेला तडा देण्याचे काम कुणीही करु नये, असे संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणो यांनी सांगितले.