शिर्डीच्या साई दरबारी सोमवारी गोव्याची पारंपरिक 'घुमट' आरती
By admin | Published: July 17, 2016 08:14 PM2016-07-17T20:14:40+5:302016-07-17T20:22:32+5:30
गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण घुमट आरतीचा गाज शिर्डीच्या साई मंदिरात घुमणार आहे. येथून जवळच असलेल्या मेरशी गावातील श्री शांतादुर्गा लईराई आरती मंडळ येत्या १८
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १७ : गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण घुमट आरतीचा गाज शिर्डीच्या साई मंदिरात घुमणार आहे. येथून जवळच असलेल्या मेरशी गावातील श्री शांतादुर्गा लईराई आरती मंडळ येत्या १८ जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री ९ वाजता शिर्डी साई मंदिरात घुमट आरती सादर करणार आहे. गोव्यातील भजनी मंडळाला शिर्डीतील साई दरबारी आरती सादर करण्यासाठी पहिल्यांदाच अशी संधी मिळाली आहे. गोव्यात घुमट या नावाने परिचित असलेल्या पारंपरिक वाद्यावरील आरती ठेक्यात आणि लयबध्दरित्या म्हटली जाते म्हणून ती लोकप्रिय आहे. सीमारेषा पार करुन ही आरती आता अन्य राज्यांतही पोचली आहे. शिर्डी साई दरबारी सोमवारी हजारो भाविक या आरतीचा लाभ घेणार आहेत, असे सूत्रसंचालक गोविंद भगत यांनी कळविले आहे