शिशिर शिंदे देणार राजीनामा? राज ठाकरेंना पाठवलं पत्र

By admin | Published: April 6, 2017 06:13 PM2017-04-06T18:13:34+5:302017-04-06T18:23:17+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्वासू सहका-यांपैकी एक माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाचं काम करणं थांबवलं

Shishir Shinde's resignation? The letter sent to Raj Thackeray | शिशिर शिंदे देणार राजीनामा? राज ठाकरेंना पाठवलं पत्र

शिशिर शिंदे देणार राजीनामा? राज ठाकरेंना पाठवलं पत्र

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विश्वासू सहका-यांपैकी एक आणि माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाचं काम करणं थांबवलं आहे. "मला नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा" अशा आशयाचं पत्र त्यांनी राज ठाकरेंना पाठवलं आहे. पक्षात आपलं मत जाणून घेतलं जात नसल्याने दुखावलेल्या शिंदे यांनी हे पाऊल उचललं आहे. 2005 ला राज ठाकरे यांच्या शिवसेनेतील बंडापासून शिंदे राज यांच्यासोबत आहेत. मनसेची घोषणा करताना राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर स्थान मिळालेली एकमेव व्यक्ती म्हणूनही शिशिर शिंदेंची ओळख आहे . 
 
मुंबई महापालिका मतदानाच्या दिवशी राज ठाकरे यांना शिंदेंनी भावनिक पत्र पाठवलं. मला नेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा" अशा आशयाचं हे पत्र आहे. भांडुप विधानसभा मतदार संघातील उमेदवार निश्चित करताना शिंदे यांना विचारणा झाली नव्हती. त्यामुळे शिंदे दुखावले गेल्याची कुजबुज आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या  वर्धापन दिनाच्या कार्यक्रमालाही शिंदे उपस्थित नव्हते. याशिवाय सध्या सुरू असलेल्या पक्षाच्या विभागवार बैठकांपासून आणि भांडुप मधील चिंतन बैठकीला शिंदेंनी दांडी मारली आहे. तसेच भांडुपमध्ये गेल्या महापलिका निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची कामगिरी आणखी खालावल्याने शिंदे व्यतिथ आहेत. असं असलं तरी शिंदे अन्य पक्षात जाणार नाहीत असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.
 
शिंदे यांची राजकीय वाटचाल-
90च्या दशकात शिंदे यांची आंदोलने जबरदस्त गाजली.शिवसेनेत असताना शिंदे यांनी पाकिस्तानी संघाला विरोध करताना मुंबईत वानखेडेची खेळपट्टी उखडून टाकण्याचं आंदोलन गाजलं. तर सणासुदीच्या काळात लोकांना तेल टंचाईचा त्रास भेडसावू लागताच शिंदे यांनी धारा तेलाचा ट्रक अडवून लोकांना टेलवाटप केलं.शिंदे गेली 35 वर्षे सक्रिय राजकारणात आहेत. शिवसेनेत असताना ते एकदा नगरसेवक आणि आमदार पदावर निवडून आले होते. मनसेत पहिल्यांदा 2009 ला लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि लक्षवेधी मतं घेतली. 2009 ला भांडुप विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून निवडून आले. 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.  
  
 
 

Web Title: Shishir Shinde's resignation? The letter sent to Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.