शिवरायांच्या जयंतीनिमित्त रायगडावर करण्यात आली डिस्को रोषणाई, संभाजी राजे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 11:45 PM2021-02-18T23:45:52+5:302021-02-18T23:50:58+5:30
यासंदर्भात संभाजी राजे यांनी ट्विट करत पुरातत्व खात्याला फटकारले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी फेसबुकवरही पोस्ट लिहित यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. (Sambhaji Raje Chhatrapati)
रायगड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shiv jayanti) किल्ले रायगडावर (Raigad Fort) डिस्को रोषणाई करण्यात आल्याने खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत पुरातत्व खात्याला फटकारले आहे. एवढेच नाही, तर संभाजी राजे यांनी फेसबुकवरही पोस्ट लिहित यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी केलेल्या या ट्विटवर आणि पोस्टवर युझर्सच्या उलट सुलट प्रतिक्रियाही योऊ लागल्या आहेत. (Shiv jayanti MP Sambhaji Raje Chhatrapati hits out archeology department over the disco lighting on raigad fort)
नेमकं काय म्हणाले खासदार संभाजी राजे -
"भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो", असे संभाजी राजे यांनी म्हटले आहे.
Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार!
त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 18, 2021
एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो.
(2/2)
शिवनेरी किल्ल्यावर कलम 144 लागू -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती(Shivjayanti) कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे, महाराष्ट्र सरकारनं(Maharashtra government) नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे.