अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती; निर्णयाची माहिती देताना आदिती तटकरे काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 14:35 IST2025-02-18T14:35:11+5:302025-02-18T14:35:48+5:30
अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.

अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती; निर्णयाची माहिती देताना आदिती तटकरे काय म्हणाल्या?
Shiv Jayanti 2025: राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
१९ फेब्रुवारी रोजी निमित्त राज्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे, याकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे.
दरम्यान, बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषांगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.