Kirit Somaiya: संजय पांडे उद्धव ठाकरेंचा नोकर आहे का? जखमी किरीट सोमय्यांचा वांद्रे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 11:20 PM2022-04-23T23:20:05+5:302022-04-23T23:20:31+5:30
Shiv Sainiks attack Kirit Somaiya: वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे.
जोवर माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होत नाही, तोवर मी पोलीस ठाण्यासमोरून हलणार नाही, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे.
किरीट सोमय्या या प्रकारानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचले असून तिथे डीसीपी देखील पोहोचले आहेत. तसेच भाजपाचे कार्यकर्तेही जमा होऊ लागले आहेत. किरीट सोमय्या हे राणा यांच्या भेटीसाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामध्ये दगड आणि बाटल्या फेकण्यात आला. यामुळे कारची काच फुटली आणि ती किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली.
किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी दगड फेकला; कारची काच फुटली. https://t.co/CbvSFUBywh#kirit_somaiya#KiritSomaiya#shivsena#ShivsenaVsRana#BJPpic.twitter.com/WzayGfokwF
— Lokmat (@lokmat) April 23, 2022
या साऱ्या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय पांडे उद्धव ठाकरेंचा नोकर आहे का, हा पोलीस कमिशनर. शेकडो गुंड पोलीस ठाण्याच्या आवारात घुसतात खुनाचा प्रयत्न करतात. माझ्यावर तीनवेळा हत्येचा प्रयत्न झाला. पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, शिवसैनिकांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा, तोवर मी इथून जाणार नाही, असे ते म्हणाले.
वांद्रे पोलीस ठाण्याकडे भाजपाचे नेते आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा येण्यास निघाले आहेत. कार्यकर्त्यांनाही बोलविण्यात आले आहे. यामुळे पोलिसांवरील दबाव आता वाढू लागला आहे.