‘शिवस्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल’

By admin | Published: November 6, 2016 02:10 AM2016-11-06T02:10:17+5:302016-11-06T02:10:17+5:30

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारावयाच्या भव्य स्मारकाचा आराखडा तयार असून, स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे

'Shiv Sankara's work will be completed in time' | ‘शिवस्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल’

‘शिवस्मारकाचे काम वेळेत पूर्ण होईल’

Next

मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभारावयाच्या भव्य स्मारकाचा आराखडा तयार असून, स्मारकाच्या कामाचे काटेकोर नियोजन करून विविध कामांचे टप्पे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.
शिवस्मारकाच्या कफ परेड येथील कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी प्रथमच भेट देऊन स्मारकाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या स्मारकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील व जगातील शिवप्रेमींचे स्वप्न शासन लवकरच पूर्ण करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, सचिव सी.पी. जोशी आणि वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवस्मारकाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच याकरिता निविदा प्रक्रि येचे काम लवकरच पूर्ण करून नवीन वर्षाच्या प्रारंभी स्मारकाच्या कामास सुरुवात होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 'Shiv Sankara's work will be completed in time'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.