शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 08:49 PM2019-07-20T20:49:15+5:302019-07-20T21:08:12+5:30

ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या.

Shiv Sasheer Babasaheb Purandare's wife and social worker Nirmala Purandare passes away | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन 

Next

पुणे : ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म  ८ जानेवारी १९३३ रोजी बडोद्यात झाला. मृत्यूसमयी त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे मुलगा प्रसाद, अमृत, मुलगी माधुरी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

 १९५७ साली त्यांनी विद्यार्थी सहाय्यक समितीतून कामाला सुरुवात केली. पुरंदरे या प्रसिद्ध माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांच्या भगिनी होत्या. या साप्ताहिकाच्या संपादन विभागात त्यांनी २० वर्ष काम केले होते. पुरंदरे यांनी वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी मागील ५० वर्षांपासून काम केले आहे. वनस्थळीमुळे भागातील अल्पशिक्षीत महिलांच्या पूर्व प्राथमिक प्रशिक्षणाची त्यांनी सोय केली. त्यातून राज्यभर हजारो सेविका आणि बालवाड्यांचे जाळे विणले. फुलगाव येथे निराश्रित बालकांसाठी बालसदनाची स्थापना केली. खेडेगावातली पहिली बालवाडी त्यांनी स्थापन केली. शाळाबाह्य तरुणांसाठी त्यांनी सुतारकाम, प्लम्बिंग सारख्या कामांच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. 'इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट' या संस्थेतर्फे माणूस घडवण्यासाठी त्या अनेक उपक्रमाचे आयोजन करत असत. त्यांना २४ व्या पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला.

Web Title: Shiv Sasheer Babasaheb Purandare's wife and social worker Nirmala Purandare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.