Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:55 PM2022-09-16T17:55:32+5:302022-09-16T17:56:27+5:30

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

shiv sena aaditya thackeray criticised cm eknath shinde and uday samant over vedanta foxconn project gone to gujarat | Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

Next

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. असा प्रकल्प जाण्याचा प्रकार दुसऱ्या राज्यात घडला असता, तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याचे प्रकरण तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा दुसऱ्या राज्यात घडले असते, तर तेथील मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिझी आहेत. आधी दहीहंडी, गणपती, आता नवरात्रोत्सव आणि नंतर दिवाळीपर्यंत त्यांना वेळ नाही. गणपतीत २५० मंडळं फिरून आले आणि आता नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मंडळं फिरायचा मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

एअरबस आणि टाटा प्रकल्पांबद्दल सरकारला माहितीच नाही

आमचे सरकार असताना एअरबस आणि टाटा यांचे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, आताच्या सरकारला असे काही सुरू होते, याबाबत साधी माहितीही नाही. आम्ही सांगितल्यावर आता पाठपुरावा करतोय म्हणून सांगत फिरतायत. ही या सरकारची अवस्था आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. दुसरीकडे, बंडखोरांबद्दल पुन्हा एका तोंडसुख घेत, आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले. त्यांना अपचन झाले आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावे लागले. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

दरम्यान, तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असं गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानंतर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

Web Title: shiv sena aaditya thackeray criticised cm eknath shinde and uday samant over vedanta foxconn project gone to gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.