मुंबईत पुन्हा शिवसेनाच?
By admin | Published: February 22, 2017 05:29 AM2017-02-22T05:29:01+5:302017-02-22T05:29:01+5:30
राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे
मुंबई : राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. इंडिया टुडे-अॅक्सिसने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये काट्याची टक्कर असून ८६ ते ९२ जागा मिळवून शिवसेना पुढे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने महापौर पद पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि नागपूर महापालिकेत भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर ठाण्यात शिवसेना पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून नाशिक महापालिका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. नाशिकमध्ये सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. तिथे शिवसेना क्रमांक एकवर राहू शकते, तर उल्हासनगरात ओमी कलानी यांच्या साई या पक्षासोबत भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज आहे. सोलापुरात कॉंग्रेसची सत्ता कायम राहू शकते.
मुंबई
शिवसेना८६-९२
भाजपा८०-८८
काँग्रेस३०-३४
राष्ट्रवादी३-६
मनसे५-७
इतर २-७
जागा : 227
पुणे
भाजप ७७-८५
राष्ट्रवादी६०-६६
शिवसेना१०-१३
मनसे३-६
इतर१-३
जागा : 162
ठाणे
शिवसेना६२-७०
भाजपा२६-३३
राष्ट्रवादी२९-३४
जागा : 130
नागपूर
भाजपा९९-११०
काँग्रेस३५-४१
शिवसेना२-४
जागा : 145